Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासकामांचे फुगे उडवणार्‍या आमदारांना घरी बसवा : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 35 वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांची अवस्था पाय ट

राज्यातील 100 सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे 9.28 कोटी थकित; थकबाकी कृषीपंप साखर पट्ट्यातील
मिरज तालुक्यात बोगस आयबी अधिकार्‍यास अटक
लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार | फिल्मी मसाला | LokNews24 |

इस्लामपूर / प्रतिनिधी : विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 35 वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांची अवस्था पाय टाकला तर गुडघाभर रुतून बसेल, अशी बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे जिने मातीमोल करणार्‍या व नुसते विकासकामाचे फुगे उडवणार्‍या आमदारांना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
रेठरे हरणाक्ष येथे 2 कोटी 60 लाख तर ताकारी येथे 18 लाख व भवानीनगर येथे 96 लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, अकार्यक्षम आमदारांमुळे इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकर्‍यांना खते, धाने, आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागते, हे येथील जनतेचे दुर्दैव आहे. परंतू आता महायुती सरकारच्या माध्यमातून या पाणंद रस्त्यांसाठी मोठा निधी आला आहे. लवकरच हे रस्ते कात टाकतील. त्याबरोबरच ताकारी ही वाळवा तालुक्यातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

COMMENTS