Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस टाकी भरताना ओटीपी आवश्यक ः विशाल जगताप

कोपरगाव शहर ः घरगुती स्वयंपाकी गॅस टाकी भरताना ग्राहकांना आता मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी नंबर देणे आवश्यक  झाले असून ग्राहकांनी सहकार्य करावे अस

जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू घडवण्यासाठी सहकार्य करू ः विवेक कोल्हे
तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी – विवेक कोल्हे
त्या पाचजणांच्या निर्णयाला आव्हान दिले जाणार? ; नगर अर्बन बँक पुन्हा राहणार चर्चेत

कोपरगाव शहर ः घरगुती स्वयंपाकी गॅस टाकी भरताना ग्राहकांना आता मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी नंबर देणे आवश्यक  झाले असून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव येथील मे.गुरुराज एचपी गॅस एजन्सीचे विशाल जगताप यांनी केले आहे.
या विषयी विशाल जगताप यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच घरगुती गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर आपल्या रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरून बुक केल्यानंतर मिळत असायचा, परंतु चालू महिन्यापासून सर्वच एलपीजी गॅस पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी घरगुती गॅस ग्राहकांनी ऑनलाइन गॅस टाकी बुक केल्यानंतर त्यांचा रजिस्टर मोबाईल नंबरवर त्या ग्राहकाची पुष्टी करण्यासाठी एक ओटीपी नंबर येणार असून तो ओटीपी नंबर तुमच्या घरी तुम्ही बुकिंग केलेले गॅस सिलेंडर पोहोचवण्यासाठी तुमचा एजन्सीचा डिलिव्हरी मॅन येईल तेव्हा त्याला तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून सिलेंडर बुक केल्यानंतर आलेला ओटीपी देणे बधनकारक केले आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी नंबर तुमचा एजन्सीच्या डिलिव्हरी मॅन ला गॅस सिलेंडर घेते वेळी सांगणे आवश्यक झाले असून त्याशिवाय आपल्याला गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही तरी आपण सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

आपल्याकडे येणार्‍या गॅस डिलिव्हरी मॅनकडे असलेल्या मोबाईल ऍप द्वारे आपण मोबाईल नंबर रजिस्टर, ई-केवायसी व गॅस सेफ्टी तपासणी या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

COMMENTS