पुणे ः पुणे शहरातील एका रुग्णालयात वीज बीलात बचत करण्यासाठी रुग्णालयाचे छतावर सौर उर्जा प्रकल्प लावण्याच्या आमिषाने एका डॉक्टरची साडेसात लाख रुपय

पुणे ः पुणे शहरातील एका रुग्णालयात वीज बीलात बचत करण्यासाठी रुग्णालयाचे छतावर सौर उर्जा प्रकल्प लावण्याच्या आमिषाने एका डॉक्टरची साडेसात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी समर्थ पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रदीप बबन जामदार (रा. भेंडा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ.हमेंत शंकरराव तोडकर (वय-47,रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॉक्टरांचे मंगळवार पेठेतील पारगे चौकात रुग्णालय आहे. तक्रारदार डॉक्टरांच्या रुग्णालयातील छतावर सौर उर्जा प्रकल्प लावण्यात येणार होता. आरोपी जामदारने सौर उर्जा प्रकल्प बसवून देण्यासाठी जामदार यांनी साडेसात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्याला सुरुवातीला 48 हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात सात लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर जामदारने काम अर्धवट सोडून दिले. सौर उर्जा प्रकल्प बसवून न देता तो पसार झाला. डॉक्टरांनी त्याच्याशी वेळोवेळी संपर्क साधला. मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सहायक पोलीस निरीक्षक एस पाटील पुढील तपास करत आहेत.
COMMENTS