Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाचे कर्ज प्रकरणे लवकर सुरू करणार

चेअरमन प्रा. बापूसाहेब गायकवाड यांचे प्रतिपादन

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांच्या सहकार्याने मोडकळीस आलेला श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघ उर्जित अवस्थेत आणु

गोधेगावात किसनगिरी बाबांच्या जन्मसोहळयास भाविकांची मांदियाळी
धामोरीमध्ये धर्मनाथ बीजेनिमित्त कार्यक्रम
अहमदनगरमध्ये “भीम पहाट” कार्यक्रमाचे आयोजन

श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांच्या सहकार्याने मोडकळीस आलेला श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघ उर्जित अवस्थेत आणुन बारा बलुतेदार सभासदांना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून लवकरच कर्ज वाटप  सुरू करणार असल्याचे प्रतिपादन खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन प्रा.बापूसाहेब गायकवाड यांनी संघाच्या 53 व्या वार्षिक सर्व साधारण सभेत केले.
श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खाली ग्रामोद्योग संघाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रा. बापूसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की अनेक दिवसांपासून जिल्हा बँकेची थकबाकी असल्याने कर्ज प्रकरणे सध्या बंद आहेत. घेतलेल्या कर्जदारांनी कर्ज भरले नसल्याने संस्था ही मागील काही वर्षांपासून डबघाईस आली होती. परंतु आपण सत्तेत आल्यापासून मोडकळीस आलेल्या संस्थेला ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न करत आहोत अवघ्या सहा महिन्यांत दहा लाख रुपये संस्थेची कर्ज वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघास सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. साध्या विश्‍वकर्मा योजना, विशेष घटक योजना व खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या योजना चालू असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष अंकुश शिंदे, नंदू ससाणे, भगवान गोरखे तसेच जेष्ठ संचालक वसंतराव सकट, संपत कुचेकर, कांतीलाल कोकाटे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानदेव शिरवाळे, रतन ससाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी व्हाचेअरमन बबनशेठ श्रीराम, संचालक नानासाहेब ससाणे, धनंजय लोखंडे, रेवतीताई घाडगे, मीराताई शिंदे, दिलीप तोरडमल, रमेश कळमकर, सुनील काळे, माजी संचालक मनोज घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद महिला पुरुष उपस्थित होत्या. सभेचे अहवाल वाचन सचिव विनायक ससाणे यांनी केले तर आभार मयूर गोरखे यांनी केले.

निधी कमी पडू देणार नाही – श्रीगोंदा ग्रामोद्योग संघाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधीचा पुरवठा करू असे आश्‍वासन जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले व संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी दिले आहे. तसेच जो कर्जदार तात्काळ थकबाकी भरेल त्यास 4 टक्के सुट देणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन प्रा.बापूसाहेब गायकवाड यांनी दिली. 

COMMENTS