Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयहिंदची जळगावात तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ः राज्यातून 200 युवक-युवतींचा सहभाग

संगमनेर ः जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव येथील जैन हिल, गांधी तीर्थ येथे 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान तीन दिवसीय ग्लो

केंद्र सरकारचा साखर निर्यातीत कोटा पद्धतीचा डाव ; खुला परवाना देण्याऐवजी कारखानानिहाय कोटा देण्याचा विचार
प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे
आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी

संगमनेर ः जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव येथील जैन हिल, गांधी तीर्थ येथे 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स 2024चे आयोजन करण्यात असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेबाबत माहिती देताना संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पर्यावरण संवर्धन, आर्थिक सक्षमता या क्षेत्रांतील लोकांच्या अधिकारांबाबत चर्चा करण्यासाठी जयहिंद लोकचळवळीकडून ग्लोबल कॉन्फरन्स 2024चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा होत असलेली पाचवी परिषद 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान गांधी तिर्थ जळगाव येथे होणार आहे. सुदृढ समाजनिर्मिती केल्याशिवाय भारत देश सशक्त जागतिक महासत्ता होता येणार नाही, या पायावर कामाची उभारणी करणार्‍या जयहिंद लोकचळवळ या संस्थेने जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. जागतिक परिषदेच्या माध्यमातून जगभरातील विचारवंत व तज्ज्ञ व्यक्ती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण विचार मांडणार आहेत. परिषदेचे उदघाटन गांधी पुरी आश्रम बालीचे संस्थापक अगसु इंद्रा उदयन यांच्या हस्ते होईल. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, दिगदर्शक मंजलु भारद्वाज, दिगदर्शक नचिकेत पटवर्धन, साहित्यिक प्रा.शरद बाविस्कर, डॉ.उज्वलकुमार चव्हाण व प्रतिभा शिंदे हे सहभागी होणार आहेत. या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये राज्यभरातील 200 युवक व युवती तीन दिवस सहभाग घेणार आहेत याचबरोबर सहा ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा सह उत्तर महाराष्ट्रातील प्रागतिक विचारांचे विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदृढ देश निर्मितीसाठी ही ग्लोबल कॉन्फरन्स नक्कीच महत्त्वाची ठरणार असून ऑनलाईन पद्धतीने अनेकांना या ग्लोबल कॉन्फरन्सचा जास्तीत जास्त तरुण व प्रागतिक विचारांच्या नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS