Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचा सुपडा साफ होणार !

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य

मुंबई ः राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजपचे माजी नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यप

गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
कळसुबाईचे मंदिर सजले वारली चित्रकलेतील रंगकामाने
मी चुकीचे काही केलेले नाही… चौकशीत ईडीला पूर्ण सहकार्य करणार…

मुंबई ः राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजपचे माजी नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होईल अशी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना मलिक म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या विधानसभा निवडणुकीत भाजपाला नुसताच फटका बसणार नाही तर या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे कुणाला काळजी करण्याची गरज नाही.  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करेल, असे मलिकांनी म्हणले आहे. मुंबईतील नागरिक संस्थेच्या कार्यक्रमात सत्यपाल मलिक बोलत होते. सत्यपाल मलिक यांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. काँग्रेस हरियाणामध्ये जवळपास 60 जागा जिंकेल. तर भाजप केवळ 20 जागा जिंकेल. 2019 च्या पुलवामाच्या हल्ल्यात 40 सीआसपीएफ जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची व्यापक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सत्यपाल मलिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुलवामा हल्ल्याच्या चौकशीचा मागणी केली होती. पुलवामाच्या हल्ल्याच्या तिसर्‍या दिवशी भाजपने या घटनेचे राजकारण केले. त्यामुळे लोकांनी मतदानावेळी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुलवामा हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मी करत आहे. आपले जवान कसे मारले गेले, हे लोकांना कळाले पाहिजे, असे ते म्हणाले होते.
मलिक पुढे म्हणाले, मी महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मी त्यांचा प्रचारही करणार आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा देशाच्या राजकीय परिदृश्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे. राज्यातील निवडणुकांचे निकाल भाजपच्या तिजोरीत शेवटचा खिळा ठोकतील. सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेवर बोलतांना म्हणाले की, माझ्या माहितीनुसार भाजपचा पराभव होत आहे, असे मी म्हटले आहे. महाविकास आघाडी जिंकेल. काही तडजोड करा पण विधानसभा निवडणुकीत एकत्र राहा, असे मी त्यांना सांगितले. भारताच्या युतीबाबत आमची थोडक्यात चर्चा झाली. तथापि, मी त्यांना आश्‍वासन दिले की महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्‍वास देखील मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

मलिक यांची भाजपवर टीकेची झोड – सत्यपाल मलिक केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करतांना दिसून येत आहे. खरंतर मलिक भाजपचे माजी नेते असून, भाजपनेच त्यांना बिहार, ओडिशा, गोवा, मेघालय आणि जम्मू काश्मीरचे राज्यपालपद देखील दिले होते. मात्र त्यांनी पूलवामा हल्ल्यावर सर्वप्रथम प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून भाजपची कोंडी केली होती. त्यातच त्यांनी थेट महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

COMMENTS