Homeताज्या बातम्यादेश

कामाच्या तणावातून अभियंत्याची आत्महत्या

चेन्नई ः पुण्यात काही दिवसांपूर्वीच एका 26 वर्षीय सीए असलेल्या तरूणीचा कामाच्या तणावामुळे मृत्यू झाला होता. त्याचप्रकारणे कामाच्या तणावामुळे एका

चिट्ठी लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या
यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.
एअर होस्टेसचा खून करणार्‍या आरोपीची आत्महत्या

चेन्नई ः पुण्यात काही दिवसांपूर्वीच एका 26 वर्षीय सीए असलेल्या तरूणीचा कामाच्या तणावामुळे मृत्यू झाला होता. त्याचप्रकारणे कामाच्या तणावामुळे एका अभियंत्याने आत्महत्या केली आहे. मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली आहे. या अभियंत्याचे नाव कार्तिकेयन असून, ते सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयन यांनी स्वत:ला इलेक्ट्रिक शॉक देऊन संपवले. कार्तिकेयन यांच्या पत्नी जयाराणी घरी आल्या तेव्हा ही सर्व घटना समोर आली. कार्तिकेयन पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासोबत चेन्नईमध्ये राहत होते. कार्तिकेयन मागील 15 वर्षांपासून एका सॉफ्टवेअर कंपनी टेक्निशियन म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच ते नवीन कंपनीत रुजू झाले होते.   मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी जयाराणी या थिरुनल्लूर मंदिरात गेल्या होत्या. मुलाला त्यांनी आईच्या घरी सोडले होते. जयाराणी घरी परतल्या त्यावेळी दरवाजा बराच वेळ वाजवून देखील कुणीच उघडला नाही. त्यावेळी त्यांनी दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला. मात्र दरवाजा उघडल्यानंतर जे चित्र त्यांना दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कार्तिकेयनचा मृतदेह विद्युत तारेला चिकटलेला आढळून आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवले. कार्तिकेयन मानसिक तणावात होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. कार्तिकेयन कामाच्या अतिरिक्त तणावामुळे मानसिक तणावात होते, अशी देखील माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. कार्तिकेयन यांना एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु आहे. कार्तिकेयन यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटदेखील सापडली आहे. यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS