Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीमध्ये भोसरी-चिंचवड मतदारसंघावरून रस्सीखेच

पुणे ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीच्या जागावाटपावर एकमत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पक्षानंतर राष्ट्रव

महायुतीकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद
महायुतीत जागा वाटपावरुन नाराजी नाट्य
महायुतीत निवडणुकीआधीच मिठाचा खडा

पुणे ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीच्या जागावाटपावर एकमत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील वेगळा ठराव मंजूर केला आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपच्या वाट्याला असणार्‍या भोसरी-चिंचवड जागा राष्ट्रवादीसाठी घेण्याचा ठराव मंजूर केला आहे.
भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्ही भोसरी आणि चिंचवडमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशारा अजित पवार गटाने दिला आहे. या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित होते. तसेच भाजपने बनसोडे यांचा विरोध केला असल्याने बनसोडे समर्थक देखील आता आक्रमक झाले असल्याचे दिसत आहे. आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, ज्या पक्षांचे ज्या ठिकाणी आमदार असणार आहेत, ती जागा त्या पक्षाच्या आमदारासाठी सोडण्यात येणार आहे. असा निर्णय महायुतीमधील सर्व पक्षांनी घेतला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे ही जागा देखील राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे. काही लोकांना हा मतदारसंघ आपल्याला मिळावा असे वाटत आहे. शेवटी युती धर्म म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे बनसोडे म्हणाले. पिंपरी विधानसभेत अजित पवार गटाचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपने केला आहे. त्यामुळे भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

COMMENTS