कोपरगाव तालुका ः सुरेगाव शासकीय वाळू डेपोमधून विना जीपीएसप्रणालीद्वारे वाळू वाहतूक होत असतांना सुरेगाव कामगार तलाठी यांनी जीपीएस प्रणाली कॅमेर्य
कोपरगाव तालुका ः सुरेगाव शासकीय वाळू डेपोमधून विना जीपीएसप्रणालीद्वारे वाळू वाहतूक होत असतांना सुरेगाव कामगार तलाठी यांनी जीपीएस प्रणाली कॅमेर्याची गरज नसल्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली असून, कोपरगाव तालुक्यात वाळूचे सत्य लाभार्थी शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
महायुती शासनाने गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध करुन देण्याचे अंवलंबलेल्या धोरणा सुरेगाव गोदावरी नदी पात्रातून साडेचार हजार ब्रास वाळुचा ठेका देण्यात आलेल्या वाळुचे खरे लाभार्थी शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. जीपीएस प्रणाली नसली तरी वाळू वाहतूक करता येवू शकते असे वक्तव्य सुरेगाव कामगार तलाठी यांनी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोपरगाव तहसिल कार्यालय गौण खनिज विभागाकडे नोंदणी झालेल्या सर्वच वाहनांना जीपीएस प्रणाली कॅमेरे अपलोड असल्यानंतरच वाळू वाहतूक करण्याचा परवाना असतांना आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता कोळपेवाडी येथील अहिल्याबाई होळकर चौका मध्ये सुरेगाव शासकीय वाळू डेपोमधून वाळू वाहतूक करणार्या वाहनांचा काही जागरुक नागरिकांनी परवाना बघितला असता पाच गाड्या पैकी तीन वाहनांना जीपी एस प्रणाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर हि बाब त्यांनी कोपरगावचे कर्तव्य दक्ष तहसीलदार यांच्या निर्देशनास आणून दिली. त्यांच्या आदेशानुसार सुरेगाव कामगार तलाठी चौकात हजर झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना ई टि पी वाहतूक परवाना मोबाईल अँप वरती चेक करण्याचे सांगितले असता तिन वाहनांना जि पी एस कँमेरे नव्हते तर एक वाहनांचा परवाना अवघ्या पंचवीस मिनीटात समाप्त झाल्याचे आढळून आले. ग्रामंस्थाच्या आरोपा नुसार एकाच पावतीवर वाहन दिवसभर चार ते पाच फेर्या मारत असते. नियमबाह्य वाहनावर कारवाई करण्या ऐवजी सदर वाहने नियमानुसार वाळु वाहतूक करत असल्याचे सुरेगाव कामगार तलाठी यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यांचे हे बेजबाबदार व्यक्तव्य ग्रामस्थांच्या चांगलेच जिव्हारी लागले असुन ग्रामंस्थ लवकरच पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकार्याची भेट घेणार आहे.
COMMENTS