Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसला गणेशपूजनाचे ही वावडे !

पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांची टीका

वर्धा ः काँगे्रसमधील देशप्रेमाची भावना संपल्यागत जमा असून, काँगे्रसला हिंदू धर्माच्या देवी-देवतांचा देखील तिटकारा आहे. त्यामुळेच त्यांना गणपती बा

पंतप्रधान मोदी उद्या करणार जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उद्घाटन
योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

वर्धा ः काँगे्रसमधील देशप्रेमाची भावना संपल्यागत जमा असून, काँगे्रसला हिंदू धर्माच्या देवी-देवतांचा देखील तिटकारा आहे. त्यामुळेच त्यांना गणपती बाप्पाचीही चीड येऊ लागली आहे. मी गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली होती, त्यांना गणेशपूजनाचे देखील वावडे असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान विश्‍वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजिक सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मी गणपतीच्या दर्शनासाठी सरन्यायाधीशांच्या घरी गेलो असता काँग्रेसमधील तुष्टीकरणाचे भूत उठले. तृष्टीकरणासाठी काँग्रेस पक्ष काहीही करू शकतो. आता काँग्रेस पक्ष गणपतीच्या आरतीचाही द्वेष करू लागला आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा गणपती उत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव बनला होता, या घटनेची ही महाराष्ट्राची भूमी साक्षीदार आहे. गणेशोत्सवात प्रत्येक धर्म आणि समाजाचे लोक एकत्र आले होते. त्यामुळेच काँग्रेसला गणपतीच्या आरतीची चीड येते’ असे ते  हणाले. काँग्रेस पक्षात आमची आस्था आणि संस्कृतीबाबत थोडा जरी सन्मान असता तरी त्यांनी गणपती आरतीचा विरोध केला नसता, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने गणपती बाप्पालाच कोठडीच डांबले होते, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ’कर्नाटकात गणपतीच्या ज्या मूर्तीची लोक पूजा करत होते, त्या मूर्तीला पोलिस व्हॅनमध्ये कैद करण्यात आले होते. इकडे महाराष्ट्रात गणपतीची आराधना सुरू असताना तिकडे कर्नाटकात मात्र गणेश मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये होती. गणपतीच्या या अपमानामुळे देशभरात संताप आहे. याविषयाबाबत बोलण्यास काँग्रेसच्या मित्र पक्षांच्या तोंडावर जणू कुलूप लागलेले दिसते. त्यांच्यावर काँग्रेसच्या संगतीचा असा काही रंग चढलाय की गणपतीच्या अपमानाविरुद्ध बोलण्याची त्यांची हिंमत होत नसल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.

कौशल्य म्हणजे विकसित भारताचा रोड मॅप – विश्‍वकर्मा योजना केवळ सरकारी कार्यक्रम नाही तर भारतातील हजारो वर्ष जुने कौशल्य म्हणजे विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी म्हटले आहे. वर्ध्यांतूनच महात्मा गांधींजींनी ग्रामीण उद्योगाला चालना दिली होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर या कौशल्यांना योग्य सन्मान दिला नसल्याचे देखील मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळे भारत आधुनिकतेच्या शर्यतीमध्ये मागे राहिला आहे. आता 70 वर्षानंतर आमच्या सरकारने या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. सन्मान, सामर्थ आणि समृद्धी हे या योजनेचे लक्ष असल्याचा दावा देखील त्यांनी केला. देशातील 700 पेक्षा जास्त जिल्हे या योजनेला गती देत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

काँगे्रसकडून दलित, ओबीसींवर अन्याय – काँगे्रस आणि त्यांच्या मित्रांनी जाणूनबुजून दलित आणि ओबीसी समाजातील लोकांना पुढे येवू दिले नाही. काँग्रेसची ही दलित आणि मागास विरोधी विचारसरणी आम्ही सरकारी यंत्रणेतून काढून टाकली आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवरून असे दिसून येते की, एससी, एसटी आणि ओबीसी समाज विश्‍वकर्मा योजनेचा लाभ घेत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

COMMENTS