Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरतीच्या बनावट संदेशामुळे जिल्हा रूग्णालयात गर्दी

नाशिक- महापालिकेच्या वैद्यकीय विभागात भरती होत असल्याचे बनावट संदेश अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने जिल्हा रुग्णालया

भरतीच्या बनावट संदेशामुळे जिल्हा रूग्णालयात गर्दी
भरतीच्या बनावट संदेशामुळे जिल्हा रूग्णालयात गर्दी
भरतीच्या बनावट संदेशामुळे जिल्हा रूग्णालयात गर्दी

नाशिक– महापालिकेच्या वैद्यकीय विभागात भरती होत असल्याचे बनावट संदेश अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने जिल्हा रुग्णालयात भरतीसाठी गर्दी उसळली. मात्र हा बनावटगिरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेरोजगारांचा हिरमोड झाला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही जिल्हा रुग्णालयात भेट देऊन महापालिकेमार्फत अशी कुठलीही भरती होत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सरकारवाडा पोलिस ठाण्यात पशुवैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद सोनवणे यांनी तक्रार दिली.

महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामध्ये विविध पदांची भरती होणार आहे. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेची नियुक्ती केली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव ठराविक कालावधीत भरती झाली नाही. येत्या काळात विविध पदांसाठी भरती होणार आहे. महापालिकेत होणाऱ्या या भरतीचा फायदा घेत काहींनी समाज माध्यमांवर भरती संदर्भात बनावट आदेश पारित केले. यामध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या रुग्णालयांमधील सिव्हिल केअर सेंटरमध्ये वार्ड बॉय, ए एन एम, मॅनेजमेंट हेल्पर, ड्रायव्हिंग, सिक्युरिटी पदासाठी बुधवारी (ता.१८) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा रुग्णालयात भरती होणार असल्याचे नमूद केले होते

त्या अनुषंगाने इच्छुकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. वास्तविक महापालिकेमध्ये भरती होत असल्याने महापालिका मुख्यालयातच इच्छुकांच्या मुलाखत होऊ शकतात, असे असतानाही जिल्हा रुग्णालयाचा पत्ता देऊन इच्छुकांना फसविण्याचा प्रकार झाला. विशेष म्हणजे नियुक्तीचे बनावट आदेश हे दोन जुलै २०२४ तारीख असलेले आहेत. त्यावर माजी आयुक्त कैलास जाधव तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांची स्वाक्षरी आहे. हा प्रकार बेरोजगार व महापालिका प्रशासनाला फसविण्याचा असल्याने या विरोधात तक्रार देण्यात आली.

”महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तिपत्र तयार करून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून कुठलीही भरती नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनाही सतर्क केले असून बेरोजगारांनी अशा प्रकारांना फसू नये.

”- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

COMMENTS