Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

आज उपोषणाचा पाचवा दिवस उपचार घेण्यास दिला नकार

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करत मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. यादिवशी त्यांची प्

कोल्हापूर, सातार्‍याला मुळसाधार पावसाचा फटका
पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी
मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करत मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. यादिवशी त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येत आहे. तरीही त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. सगेसोयरे अधिसूचना लागू करण्यासह सरकारने हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट तत्काळ लागू करावे अशी त्यांची मागणी आहे.
मनोज जरांगे यांची डॉक्टरांच्या पथकाने त्यांची दिवसभरात तीन वेळा तपासणी केली. यावेळी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या पथकाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांची तपासणी करत उपचार घेण्यासाठी विनंती केली. पण जरांगे पाटील यांनी नकार दिला. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली. जरांगे यांची शुगर लेव्हल 70 वर आली असून बिपी कमी झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे. जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा टोला ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे.

COMMENTS