Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महंत श्री सुनीलगिरी महाराज यांची मिरवणूक काढून संतपूजन

नेवासा फाटा ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या अकरा दिवशीय मौन व्रत व अ

2024 ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील – बाळासाहेब थोरात 
प्रहार च्या संघटकपदी तिपायले यांची नियुक्ती
तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज ः विवेक  कोल्हे

नेवासा फाटा ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या अकरा दिवशीय मौन व्रत व अनुष्ठान समाप्ती निमित्ताने भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भाविकांनी त्यांचे संतपूजन करून आशीर्वाद घेतले.
          प्रभु रामचंद्र, प.पू. ब्रम्हलिन योगिराज प्रल्हादगिरीजी महाराज, ब्रम्हलिन सद्गुरु स्वामी प्रकाशगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व  देवगडचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त गुरुवर्य महंत सुनिलगिरीजी महाराज यांचे शनिवारी 7 सप्टेंबर पासून मौन व्रत व अनुष्ठान सुरू केले होते.व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी ही असू नये,धर्म वैभव वाढावे,सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्यात हा मौन व्रत व अनुष्ठान मागचा मुळ उद्देश होता. अनुष्ठान व मौन व्रत समाप्ती झाल्यानंतर गुरुवर्य महंत श्री सुनीलगिरीजी महाराज हे आपल्या कुटियातून बाहेर आले. यावेळी उपस्थित सुवासींनीनी त्यांचे कुंकूम तिलक करत पुष्पवृष्टी करत स्वागत केले.यावेळी मंगलवाद्य सनई तुतारीच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी पुष्पांनी गणपतीची पालखी सजविण्यात आली होती. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजर करत यावेळी मुख्य सभामंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गायनाचार्य हभप सचिन महाराज पवार यांचे किर्तन झाले सदर कीर्तनात त्यांनी महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे सुरू असलेले धर्म कार्य,धर्म जागृतीसाठी सुरू असलेली जनजागृती,भाविकांमध्ये आध्यात्मिकता वाढीस लावण्यासाठी दरवर्षी श्रीराम साधना आश्रमाच्या माध्यमातून होत असलेले परमार्थ कार्य याची माहिती देऊन धर्म जनजागृतीसाठी त्यांचे कार्य मोलाचे असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मध्यमेश्‍वर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज, वेल्हाळे येथील महंत श्री मुक्तानंदगिरीजी महाराज, चिलेखनवाडी येथील आश्रमाचे महंत पंचमपुरीजी महाराज, भागवताचार्य साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य, भागवताचार्य तुलसी दीदी गायनाचार्य, हभप सचिन महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, मंगेश महाराज वाघ, विणेकरी पोपट महाराज निपुंगे, सेवेकरी वैभव निकम यांच्यासह श्रीराम सेवा मंडळ मुकिदंपूर-नेवासा फाटा येथील सेवेकरी, श्रीराम साधना आश्रमातील भक्तगण भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. देवगडफाटा येथील सेवेकरी योगेश रमेश जाधव बागायतदार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
 

COMMENTS