Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गिरीश डागा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

विचार भारती व श्रीनी फौंडेशनचा उपक्रम

संगमनेर ः संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे समुपदेशक, मुलांमधील सर्जनशीलतेला पैलू पाडणारे शिक्षक गिरीश डागा यांनी शालेय अध्यापन, शिक्षक-पालक प्रशि

पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…
राज्यसभेत महिला खासदारांवर मार्शलकरवी हल्ला ; काँगे्रसचा गंभीर आरोप l DAINIK LOKMNTHAN
माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या

संगमनेर ः संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे समुपदेशक, मुलांमधील सर्जनशीलतेला पैलू पाडणारे शिक्षक गिरीश डागा यांनी शालेय अध्यापन, शिक्षक-पालक प्रशिक्षण आणि समुपदेशनाच्या क्षेत्रासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. विचार भारती आणि श्रीनी फौंडेशनच्या वतीने अहमदनगरमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख 15 हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
शालेय शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करुन राष्ट्र उभारणीत योगदान देणार्या शिक्षकांच्या आदर्शांची सर्वांना जाणीव व्हावी या उद्देशाने या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी पासष्टहून अधिक शाळांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. या पुरस्काराची निवड करताना पारदर्शकता आणि सत्यता समोर ठेवून शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांसारख्या उच्चपदस्थ मान्यवरांद्वारा सन्मानीत झालेल्या व्यक्तींचे परीक्षक मंडळ तयार करुन तीन स्तरांतून आदर्श शिक्षकाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या शिक्षकांच्या थेट मुलाखती घेतल्या गेल्या. या शिक्षकांचे कामकाज पडताळण्यासाठी स्थानिक पातळीवरुन त्यांच्या कामाचा तपशील घेण्यात आला. त्यातून शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरावे अशाप्रकारे काम करणार्या शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे समुपदेशक गिरीश डागा यशस्वी ठरले. प्रयोगशीलता, पालक-शिक्षक प्रशिक्षण, राष्ट्रीयस्तरावर संस्कारकार्य, सामाजिक क्षेत्रातील सेवाकार्य, नाट्य लेखन, दिग्दर्शन इत्यादी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव विश्‍वास आठरे यांच्या हस्ते डागा यांना पुरस्कार देण्यात आला. अहमदनगरमध्ये पार पडलेल्या या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षपदी शिक्षणतज्ज्ञ, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. तर, सावित्रीबाई फुले-पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त संचालक रविंद्रजी शिंगणापूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

COMMENTS