Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सक्षम तिसरा पर्याय देणार !

शेतकरी नेते राजू शेट्टी ः राज्यात टोळीयुद्धाप्रमाणे राजकारण सुरू असल्याची टीका

पुणे ः राज्यातील जनता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कारभाराला आणि राजकारणाला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहे. अ

राज्यात होणार ई-पंचनामे
काळ्या पोशाखात नवनीत राणाची बुलेट राईड
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 3 लाचखोरांना सीबीआयकडून अटक

पुणे ः राज्यातील जनता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कारभाराला आणि राजकारणाला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न तयार होत आहे. महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, असंघटित कामगार प्रश्‍न, महागाई आदी प्रश्‍न असून या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेवून तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरूवारी दिली.
पुण्यातील शिवाजीनगर येथील स्वराज भवन येथे छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरराव धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश यांनी भेट घेऊन चर्चा केली. सर्व नेत्यांची एकत्रित व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे गुरुवारी बैठक होऊन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर माध्यमांशी राजू शेट्टी बोलत होते. यावेळी बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, प्रस्थापितांना शह देण्यासाठी व राज्याचा सातबारा हा कोणा एका पक्षाची, नेत्याची मक्तेदारी नाही हे दाखवून देत आहे. राज्यात टोळीयुध्दा प्रमाणे राजकारण सुरु असून राजकारणाचा स्तर रसतळाला गेला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राजू शेट्टी म्हणाले की, देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र मध्ये होत आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला असून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वेगवेगळे नेते एकत्रित येत आहे. पुण्यात सर्वांची एकत्रित बैठक घेऊन सक्षम पर्याय व आश्‍वासक चेहरा निवडून त्यामागे ताकद उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आमच्यासोबत येण्याचा कोणता प्रस्ताव आलेला नाही. स्वत:चे अजेंडे मागे ठेवून समान धोरण कार्यक्रमावर एकत्रित यावे असे प्रयत्न केले जातील हा प्रश्‍न यंदा यशस्वी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बच्चू कडू यांनी महायुतीमधून अप्रत्यक्षपणे बाहेर पडल्याचे सांगितले. तिसर्‍या आघाडीने परिवर्तन महाशक्ती असे नाव दिले आहे. 26 सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे.

समविचारी पक्षांना सोबत घेवून परिवर्तन घडवू ः संभाजीराजे – निवडणुकीत लोकांना वेगळा पर्याय पाहिजे आहे त्यादृष्टीने आम्ही समविचारी सर्व संघटना, पक्ष एकत्रित येत आहे. शेतकरी संघटनेचे अनेक नेते आमच्यासोबत आहे सर्वांचा मिळून एकसमान धोरण ठरविण्याबाबत चर्चा केली जात आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात अनेकजण वेगवेगळया पक्षात सोईनुसार उड्या मारत आहे. देश कृषीप्रधान असून शेतकर्‍यांनाच त्रास होत असेल तर विकासाकडे आपण जाणार कसे आहे. शेतकरी नेते विविध संघटनाचे ते एकत्रित यामाध्यमातून येत असून परिवर्तन आघाडी यापुढे कार्यरत असेल. राज्यात एक सक्षम पर्याय तिसरी आघाडी माध्यमातून देण्यात येईल, असे स्पष्ट संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहेत.

महायुती सोडली ः  बच्चू कडू – तिसर्‍या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर बच्चू कडू माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, मी महायुतीतून बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथे आलो आहे, तर महायुती सोडली, असे म्हणत महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर केले.  लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देत बंडाळी केली होती. बच्चू कडू म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळवू. जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणे आम्हाला जमणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS