Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बजरंग दल व दुर्गावाहिनीकडून गणरायाचे निर्विघ्न विसर्जन

संगमनेर ः अनंत चतुर्दशीला प्रवरा नदीवरील पहिला घाट व गंगामाई घाट येथे अतिशय भक्तीमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन सकाळी 8:00 वा. सुरू झाले. दरवर्षी

महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात
महेश्‍वर यात्रेनिमित्त कोळपेवाडी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करा :विवेकभैया कोल्हे

संगमनेर ः अनंत चतुर्दशीला प्रवरा नदीवरील पहिला घाट व गंगामाई घाट येथे अतिशय भक्तीमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन सकाळी 8:00 वा. सुरू झाले. दरवर्षीप्रमाणे याही 9 व्या वर्षी कोणत्याही हिंदूंची जिवीतहानी टाळण्यासाठी विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी संगमनेर प्रखंडाकडून बाप्पांचे विसर्जन विधीवत आणि वाहत्या पाण्यात व्हावे, यासाठी नदीवर सर्व बजरंगीनी व दुर्गा यांनी सेवाकार्य देऊन बाप्पांचे अगदी विधीवत धार्मिक पद्धतीने वाहत्या पाण्यात विसर्जन करून बाप्पांचा निरोप घेतला. विहिंप बजरंग दल, दुर्गावाहिनी व सर्व शहरवासीयांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे विधीवत निर्विघ्न, कोणतीही जीवितहानी न होता विसर्जन करण्यात आले. यावेळी विहिंप दुर्गावाहिनी संयोजिका अ‍ॅड. सोनाली बोटवे, जिल्हा सहसंयोजिका शामल बेल्हेकर, गौरी राठी, राशी राठी, तनिष्का राठी, सौम्या बेल्हेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS