Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धेत सहभागी व्हा ः राजेंद्र फंड

राहाता प्रतिनिधी ः  शेतकर्‍यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या 89  व्या जयंतीदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेने सालाबादप्रमाणे याही वर

अवघ्या 10 मिनिटांत घर बसल्या बनवा पॅन कार्ड | पहा ‘सकाळच्या बातम्या’ | Lok News24
पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे
संगमनेर बसस्थानक परिसरात साचले पाणीच पाणी

राहाता प्रतिनिधी ः  शेतकर्‍यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या 89  व्या जयंतीदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेने सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्‍वस्तरीय लेखन स्पर्धा 2024 चे आयोजन केले आहे. यावर्षी शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेतमालाचा भाव  हा विषय ठेवण्यात आला असून या विषयावर दोन हजार शब्दापर्यंत लिहिण्याची मर्यादा दिली गेली आहे. या स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील. यामध्ये गद्यलेखन स्पर्धा-2024 यात ललितलेख, कथा, वैचारिक लेख, मागोवा, शोधनिबंध हे प्रकार असतील. तर दुसर्‍या प्रकारात पद्यलेखन स्पर्धा-2024, यात पद्यकविता, छंदमुक्त कविता, छंदोबद्ध कविता, गझल, गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी) हे काव्याचे प्रकार असतील. तर तिसरा प्रकार अनुभवकथन स्पर्धा-2024 यात सुखद अनुभव, दुःखद अनुभव हे प्रकार असतील. चौथा प्रकार समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-2024 यात पुस्तक समीक्षण ,ललित लेखांचे समीक्षण, कवितेचे रसग्रहण या साहित्याचा समावेश असेल.
                    समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची, लेखाची, कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. मात्र  लेख, कविता शेतमालाचे भाव या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य  असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक, कवीची असेल. जगभरातील मराठी साहित्यिक, विचारवंत या स्पर्धेत भाग घेत असतात. आलेल्या साहित्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस हे स्मृतिचिन्ह, सर्टिफिकेट व नामवंत, विचारवंत साहित्यिकांचे पुस्तके हे असून बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. सदरची विश्‍वस्तरीय लेखन स्पर्धा ही 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत असून आपले लेखन कसे करावे यासाठी  हीींिीं://ुुु.लरश्रळीरक्षर.लेा/ळीं-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यिक, साहित्यरसिक, विचारवंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन मंडळातील गंगाधर मुटे, राजेंद्र फंड, श्रीम. संगीता थोरात यांनी केले आहे.

COMMENTS