Homeताज्या बातम्यादेश

सशस्त्र दलाच्या जवानाचा गोळीबार; दोन जवान शहीद

रांची ः छत्तीसगडमध्ये सशस्त्र दलाच्या जवानाने क्षुल्लक कारणांवरून आपल्याच दोन जवानांवर केलेल्या गोळीबारात 2 जवान शहीद झाले आहेत, तर 2 जवान जखमी झ

 ड्रग्स प्रकरणात आमदार खासदार हप्ते घेतात 
बांधकामच्या भिंतींना भ्रष्टाचाराचे प्लास्टर ; अशोकराव! घरभेद्यांना वेसण घाला !
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये मोर्चा

रांची ः छत्तीसगडमध्ये सशस्त्र दलाच्या जवानाने क्षुल्लक कारणांवरून आपल्याच दोन जवानांवर केलेल्या गोळीबारात 2 जवान शहीद झाले आहेत, तर 2 जवान जखमी झाले आहेत. दोघांना कुस्मी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण बलरामपूर जिल्ह्यातील सामरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुताही कॅम्पशी संबंधित आहे. सशस्त्र दलाच्या सैनिकाने जेवणाच्या वेळी मिरची न दिल्याने त्याच्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला. एका जवानाचा गोळी लागल्याने तर दुसर्‍याचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.

COMMENTS