Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानासाठी येणारी निवडणूक जिंकावी लागेल

अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पाथर्डी ः स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी जिल्ह्यातील दरबारी राजकारण संपवण्यासाठी विस्थापितांचा मोठा लढा उभारून चळवळ चालवत नाही रे वर्गाला स्वाभिमान

महिलेच्या केसावर थुंकणार्‍या जावेद हबीबवर गुन्हा दाखल करावा
 शहरटाकळी येथे बंद व रास्ता रोको
बोठे दाम्पत्याकडे बेनामी संपत्ती?…चौकशीची मागणी

पाथर्डी ः स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी जिल्ह्यातील दरबारी राजकारण संपवण्यासाठी विस्थापितांचा मोठा लढा उभारून चळवळ चालवत नाही रे वर्गाला स्वाभिमान शिकविला त्यांना मुख्य प्रवाहात आणले त्यामुळे स्वाभिमानाची ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी येणारी निवडणूक जिंकावीच लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅउ. प्रतापराव ढाकणे यांनी केले.
शहरातील संस्कार भवन येथे पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ तसेच शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केदारेश्‍वर चे उपाध्यक्ष माधवराव काटे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, सविता भापकर, वजीर पठाण, बंडू पाटील बोरुडे, दिगंबर गाडे, महारुद्र कीर्तने, बद्री बर्गे, ज्योती जेधे, आरती निराळी, हरीश भारदे, बाळासाहेब डाके, योगेश रासने, देवा पवार शंकर काटे, रामराव चव्हाण, बाळासाहेब खेडकर, वसंतराव खेडकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ढाकणे पुढे म्हणाले की, या मतदारसंघाचे वीस वर्षे वाया गेली एक पिढी संपवली स्वतःच्या मोठेपणासाठी मतदार संघ विटेस धरला इमारती बांधले रस्ते बांधले म्हणजे प्रगती झाली असे नाही.या दोन तालुक्यात विद्यमान लोकप्रतिनिधीने किती रोजगार निर्माण केली प्रशासन सर्वसामान्यांसाठी राबवले का ही लढाई उपक्षितांच्या हितासाठी आहे.गेल्या दहा वर्षात लोकशाहीचे फायदे मूठभर लोकांसाठीच वापरले गेले ते 30 वर्षे लोकांसाठी लढतोय मतदारसंघाच्या स्वाभिमानासाठी कष्ट घेतोय यातून माझा कोणताही स्वार्थ नाही आमदारकी मिळून मला माझा प्रपंच मोठा करायचा नाही.नाही रे वर्गाची चळवळ पुढे न्यायचे आहे दोन्ही तालुक्यासाठी माझी विकासाच्या दृष्टीकोनातील स्वप्न वेगळे आहेत जी प्रत्यक्षात उतरवायचे आहेत गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र धर्म बुडविला त्या उलट पन्नास वर्षांपासून जेष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांसाठी आयुष्य वेचले महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आजही या वयात शरद पवार महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी कष्ट घेत आहेत हे अभिमानास्पद आहे मतदारसंघातील काही जण उमेदवारीवरून वावड्या उठवत आहेत मात्र आपल्याला त्याची चिंता नाही शरद पवारांची ताकद काय आहे हे मी चांगली जाणून आहे अडचणीच्या काळात ज्यांनी त्यांना सोडलं त्यांना शरद पवार कधीच माफ करणार नाहीत उमेदवारीच्या अफवा पसरवून लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा डाव काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत असे ते शेवटी म्हणाले.यावेळी भालगाव पंचायत समिती गणातील शेकडो तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला.

COMMENTS