Homeताज्या बातम्यादेश

हिमाचलमधील मशिदीचे 2 मजले पाडण्याचे आदेश

मंडी ः हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद पाडावी लागणार आहे. मशिदीचे बेकायदा बांधकाम 30 दिवसांत हटवावे लागेल, असा निकाल महा

विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र
30 वर्षीय महिलेचा डोकं उडवलेला नग्न मृतदेह | LOKNews24
आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज ः माजी लोकायुक्त टहलियानी

मंडी ः हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद पाडावी लागणार आहे. मशिदीचे बेकायदा बांधकाम 30 दिवसांत हटवावे लागेल, असा निकाल महापालिका आयुक्त मंडी एचएस राणा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दिला. पूर्वी या जागेवर एक मजली मशीद होती, तिथे कोणतीही कारवाई केली जाणार नाही. दरम्यान, जेलरोडवर बांधलेली मशिदीची बेकायदा भिंत गुरुवारीच मुस्लिम समाजाच्या लोकांनी पाडण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण करून बांधलेली भिंत खुद्द मुस्लिम समाजाचे लोकच तोडत आहेत.

COMMENTS