Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अंधातरी अडकला आहे. त्यामुळे खडसे पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसनाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समिती निवडणुकांमध्ये सर्वात जास्त यश हे महाविकास आघाडीला मिळालेले तुम्हाला दिसेल- एकनाथ खडसे
एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  
शिंदे गटाचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अंधातरी अडकला आहे. त्यामुळे खडसे पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसनाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँगे्रसने त्यांना पुन्हा पक्षात घेण्यास काही नेत्यांचा विरोध असल्यामुळे खडसे यांचा राजकीय वनवास कधी संपेल असा प्रश्‍न उपस्थित होत असतांना देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.  फडणवीसांनी मनापासून प्रयत्न करेन असे सांगितले होते.
फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्‍वासन दिले होते, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले. दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्याने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे देखील एकनाथ खडसेंनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले. खडसे म्हणाले, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते देणार ते काही झाले नाही त्यामुळे माझा विश्‍वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्‍वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झाले मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्‍वासन दिली होते. साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे. ज्या वेळेस मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्या कालखंडामध्ये माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत मी असताना  जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला, असा दावा देखील खडसे यांनी केला आहे.

COMMENTS