कोपरगाव तालुका : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राम्हणगाव येथे शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. सदर मंत्रिमंडळ निर्मिती ही लोकशाहीचे मू
कोपरगाव तालुका : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राम्हणगाव येथे शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. सदर मंत्रिमंडळ निर्मिती ही लोकशाहीचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत सर्व विद्यार्थ्यांनीच आपल्या परीने वेगवेगळी कामे करत मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी, व केंद्राध्यक्ष होऊन मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
मतदानाच्या या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल आणि टॅबच्या आधारे ही निवडणूक प्रक्रिया इव्हीएम मशीन अँप द्वारे घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर मतदान कसे केले जाते याचा अनुभव देण्यात आला इयत्ता पाचवीतील विद्यार्थी उमेदवार होते. तर इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान करून स्वतः शाळेच्या मंत्रिमंडळाची निवड केली. सर्वांदेखत मंत्री होण्यासाठी उमेदवारांनी सर्व मुलांना मतदानाची खरी प्रक्रिया कशी असते हे समजून सांगितले होते नंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी येऊन मतदान केले त्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद होता कारण त्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करता आले होते. मतदानाची मतमोजणी लगेचच विद्यार्थ्यांसमोर करून विद्यार्थ्यांसमोर करून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. यात मुख्यमंत्री-तनिष्क नवनाथ सानप, उपमुख्यमंत्री -कोमल शरद पवार,क्रीडामंत्री-गौरव जाधव परिपाठ मंत्री, अली शेख स्वच्छता मंत्री सार्थक मोरेआरोग्यमंत्री, कीर्ती जाधव शिस्त मंत्री वैष्णवी मोरे सांस्कृतिक मंत्री साई शिंदे गौरव देसाई स्काऊट मंत्री प्रियंका अहिरे यांची निवड झाली यावेळेस माजीसरपंच मा शोभाताई बनकर, बाळासाहेब बनकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब केकान, उपाध्यक्ष वैशाली मोरे, सोमनाथ पवार, तसेच पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यासाठी मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक वाकचौरे यांनी केले. श्रीमती जाधव व निकम यांनी मतदान केंद्र उभारणी व उमेदवार निवड याबाबत विद्यार्थ्यांना मदत केली. लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. व शालेय मंत्रीमंडळ तयार करण्यात आले.
COMMENTS