मुंबई : समृद्धी महामार्ग पूर्णत्वास झाला असला तरी, इतर महामार्गाला मात्र स्थानिक शेतकर्यांचा विरोध तीव्र होतांना दिसून येत आहे. शक्तीपीठ महामार्
मुंबई : समृद्धी महामार्ग पूर्णत्वास झाला असला तरी, इतर महामार्गाला मात्र स्थानिक शेतकर्यांचा विरोध तीव्र होतांना दिसून येत आहे. शक्तीपीठ महामार्गावरील जमीन भूसंपादन करण्यास शेतकर्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर सरकारकडून या महामार्गाला ब्रेक लावावा लागला होता. त्यानंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाला देखील बे्रक लावण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.
स्थानिक शेतकर्यांनी भूसंपादनाला विरोध केल्याने शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक या तीनही महामार्गांचे भूसंपादन थांबवण्यात आले आहे. नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. तर पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांची जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची गुंतवणूक होती. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग उभारण्यात येणार होते. मात्र शेतकर्यांनी या प्रकल्पांना तीव्र विरोध केला आहे.
शेतकर्यांच्या विरोधात जाऊन सरकार कोणताही महामार्ग लादणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते, त्यानुसार आता सरकारने तिन्ही महामार्गांचे भूमिअधिगृहण थांबवले आहे. समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग उभारण्यात येणार होते. राज्याची दळणवळण व्यवस्था मजबूत व सुलभ करण्यासाठी हे प्रकल्प मोठी भूमिका बजावणार होते. मात्र आता या तिन्ही महामार्गाचे काम थांबवण्याची सरकारवर नामुष्की ओढवली आहे. महामार्गाच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकर्यांनी विरोध केल्याने एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन महामार्ग सध्या वादाच्या भोवर्यात अडकल्याने सरकारला माघार घ्यावी लागली आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र याला सुरुवातीपासूनच शेतकर्यांचा विरोध होता. यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. ‘औद्याोगिक महामार्गाने पुणे -नाशिक अंतर केवळ 2 तासात पार केले जाणार होते. या महमार्गासाठी भूसंपादन देखील सुरू होते. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरून तीर्थक्षेत्र शेगावला अतिजलद वेगात जाता यावे यासाठी सिंदखेडराजा-शेगावदरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करून भक्तीपीठ मार्ग तयार करण्यात येणार होता. मात्र बुलडाण्यातील शेतकर्यांनी विरोध केल्याने ‘भक्तीपीठ महामार्ग’ रद्द करण्यात आला.
COMMENTS