मुंबई/प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी केंद्रसरकारने राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी तयार करण्य
मुंबई/प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी केंद्रसरकारने राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की केंद्राने महत्त्वाचे पाऊल टाकले मात्र ही केंद्राने शुद्ध फसवणूक केली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
1992 साली नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंद्रा साहनी विरुद्ध भारतसरकार या खटल्यात आरक्षणासंबंधी महत्त्वाचा निकाल दिला. 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिला. मध्यंतरी आणखी एक दुरुस्ती करुन त्यात 10 टक्के वाढ करण्याची तरतूद घटनेत दुरुस्ती करुन दिली. राज्यसरकारने यादी तयार करुन ओबीसींना आरक्षण देऊ शकता असे सांगितले. पण प्रत्यक्षात याचा काही उपयोग होणार नाही. आज देशात जवळपास 90 टक्के राज्यात 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. त्याची आकडेवारी शरद पवार यांनी माध्यमांसमोर मांडली. त्यामध्ये मध्यप्रदेश 63, तामिळनाडू 69, हरयाणा 57, राजस्थान 54 यामध्ये जवळपास सर्वच राज्यात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्यांना अधिकार दिले. यात तथ्य नाही. केंद्र सरकारने संबंध ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे. हे लोकांसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे. केंद्राने जी फसवणूक केली आहे सामाजिक प्रश्नात सर्वांना एकत्र करून विरोधी जनमत तयार करण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगेलच रंगताना दिसून येत आहे. यावर भाष्य करतांना राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, मी राज्यपालांचे स्टेटमेंट वाचले आहे. त्यांनी कुणालातरी सांगितले की सध्याचे सरकार यावर मागणी करत नाही, तुम्ही कशाला करता? उद्धव ठाकरेंचे पत्र यापूर्वीच त्यांच्याकडे गेलेले आहे. नवाब मलिक स्वत: त्यांना पत्र देऊन आले आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ देखील त्यांना या मुद्द्यावर भेटून आले आहे. कदाचिक वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आले नसेल. पण त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. आम्ही आता त्यावर बोलतही नाही. आपल्याकडे म्हण आहे की शहाण्याला शब्दांचा मार. पण शहाण्यांना! त्यामुळे उगीच कुठेही शब्द वाया घालवणे गरजेचे नाही, असे म्हणत पवारांनी राज्यपालांना खोचक टोला लगावला.
राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असे खरमरीत उत्तर पवारांनी दिले. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असं राज ठाकरे म्हणाले होते. कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिले. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळे डिझाईन झाले आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोलले गेले, असेही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केले होते.
COMMENTS