Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा नेत्यांचे आंदोलन

सोलापूर : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. मात्र या कोंडीतून वाट काढण्याचा प्रयत्न सुरू अ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
 कांद्याला भाव द्या ; शेतकऱ्यांची आर्त हाक
बदलापूर घटनेतील आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल

सोलापूर : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. मात्र या कोंडीतून वाट काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे मनोज जरांगे यांच्याविरोधात मराठा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी आंदोलन केले. सोलापूरच्या बार्शी येथील अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगेंच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब शिंदे या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने मनोज जरांगे यांना काही प्रश्‍न विचारले होते, मात्र त्यावर काही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णासाहेब शिंदे यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

COMMENTS