Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी शहर शंभर टक्के सौर शहर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज :  संचालक प्रसाद रेशमे

Preview attachment IMG-20240904-WA0001.jpg शिर्डी: संपूर्ण शिर्डी शहराला सौर शहर करण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने

किनवट शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले ; गौण खनिजमधून सर्वाधिक 103 टक्के वसूली
प्रकाश आंबेडकर आज लोकसभेबाबत भूमिका जाहीर करणार ?

Preview attachment IMG-20240904-WA0001.jpg

शिर्डी: संपूर्ण शिर्डी शहराला सौर शहर करण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शिर्डी शहरातील घरगुतीसह सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे त्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातुन तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्र शासनाकडून सबसिडी देण्यात येत असून त्यामुळे शिर्डी शहरातील सर्व वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि शिर्डी शहर सौर शहर करण्यासाठी समाजातील व प्रशासनातील सर्व घटकांच्या सहकार्याची गरज असुन सर्वांच्या मदतीने येत्या डिसेंबरपर्यंत शिर्डी शंभर टक्के सौर शहर करु असा आशावाद महावितरणचे संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केला.

महवितरणच्या शिर्डी उपविभागाच्या वतीने शिर्डी सौर शहर करण्यासाठी आज बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी शांतीकमल भक्तनिवास, शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक संवाद मेळाव्यात उपस्थित ग्राहक, वित्तीय संस्था (बॅन्क), सौरप्रणाली विक्रेते आणि महावितरणचे अभियंते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. 

याप्रसंगी या मेळाव्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर, कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता रमेश पवार, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिश दिघे, अखिल भारतीय नवीकरणीय उर्जा असोसिएशनचे अध्यक्ष साकेत सुरी व कार्यकारी अभियंता अनिल थोरात मंचावर उपस्थित होते.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यावेळी, शिर्डी शहराची सौर शहर करण्याकरीता निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. शिर्डी हे सौरउर्जा निर्मितीसाठी अनुकुल असुन या योजनेला मी सर्वोतपरी मदत करणार आहे. यासोबतच मतदारसंघातील आणखी काही गावे सौरग्राम करण्याकरीता संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. सौरउर्जा ही काळाची गरज असुन प्रत्येक घरगुती ग्राहकाने प्रधानमंत्री सौर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी, शिर्डी शहराला आंतरराष्ट्रीय ओळख असुन शिर्डीतील सर्व शासकीय कार्यालये सौरउर्जेवर आणण्याकरीता प्रयत्नशिल असल्याचे सांगीतले. सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्र येऊन ही योजना राबवील्यास शिर्डी शहर सौर होण्यास अडचण येणार नाही.

महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर यांनी, सौर योजनेत सहभाग घेऊन आपण पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वाचे कार्य करीत असुन त्यामाध्यमातुन हरितउर्जा निर्माण करीत असल्याचे सांगीतले. या योजनेमध्ये महावितरण्याच्या माध्यमातुन आणखी गतीमानता येणार असुन वीज जोडणीसाठी कुणालाही महावितरणच्या कार्यालयात येण्याची गरजच राहणार नाही अशी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. 

महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शिर्डी सौरशहर आराखड्याची विस्तृत माहिती संगणकीय सादरीकरणातुन दिली शिर्डी शहर संपुर्णतः सौर करण्याकरीता तयार करण्यात आलेला नियोजन आराखड्याची माहिती दिली ही योजना यशस्वी करण्यासाठी महावितरण गतीने कार्यरत असुन त्यामुळे उद्दिष्ट लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी सांगीतले.

यावेळी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश दिघे यांनी शिर्डी नगरपरिषद अंतर्गत वीज यंत्रणा सौर करण्यासाठी कार्यरत असून यासोबतच पंतप्रधान सौर घर मोफत वीज योजनेचा शहरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा म्हणून महावितरणला मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच यावेळी विनोद गोंदकर, रमेश गोंदकर या सौर योजनेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांनी आणि भारतीय स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक सचिन खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी तर आभार प्रदर्शन अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश पवार यांनी केले. कार्यक्रमाला संगमनेर विभागातील व शिर्डी उपविभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी शिर्डी शहरातील ग्राहक सौर एजन्सी, वित्तीय संस्था बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी ग्राहकांना माहिती देण्यासाठी सौर एजन्सी आणि वित्तीय संस्था यांनी स्टॉल्स उभारले होते, इच्छुक ग्राहकांनी त्यांचेकडून यासंदर्भातील सविस्तर माहिती घेतली.मेळावा यशस्वी करण्यासाठी शिर्डी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील यांचेसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

COMMENTS