अकोले ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अर्थात माकपला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 12 जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात, तसेच महाविकास आघाडीच
अकोले ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अर्थात माकपला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 12 जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात, तसेच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवत असताना त्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांचे सर्व प्रमुख मुद्दे त्यामध्ये यावेत अशी मागणी केली. या शिष्टमंडळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, माजी आमदार व ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर, कामगार नेते डॉ. डी. एल. कर्हाड व डॉ. अजित नवले यांचा समावेश होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगली मदत केली. विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला या पार्श्वभूमीवर योग्यरीत्या सामावून घेतले जाईल, तसेच किमान समान कार्यक्रम व निवडणूक जाहीरनामा बनवण्याच्या प्रक्रियेतही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आग्रह प्राधान्याने विचारात घेतले जातील असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्यात शेतकरी कामगार कर्मचार्यांचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने श्रमिकांच्या या सर्व प्रश्नांबाबत नेटाने संघर्ष करत आहे. महाविकास आघाडीने ही या सर्व श्रमिकांच्या प्रश्नांमध्ये अधिक सजगतेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे प्रश्न कशाप्रकारे सोडवले जातील याबद्दलही आघाडीच्या नेत्यांनी जनतेला आस्वस्थ करण्याची आवश्यकता आहे. माकपचे हे म्हणणे यावेळी शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडले.
माकपला हव्यात या बारा जागा – डहाणू -जिल्हा पालघर, कळवण -जिल्हा नाशिक, सोलापूर (मध्य)-जिल्हा सोलापूर, नाशिक (पश्चिम)-जिल्हा नाशिक, अकोले -जिल्हा अहमदनगर, किनवट-जिल्हा नांदेड, पाथरी-जिल्हा परभणी, माजलगांव-जिल्हा बीड, दिंडोरी -जिल्हा नाशिक, इगतपुरी- जिल्हा नाशिक, विक्रमगड -जिल्हा पालघर, शहापूर – जिल्हा ठाणे या जागांचा समावेश आहे.
COMMENTS