Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहत्यात मविआकडून जोडे मोरो आंदोलन

राहाता ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला त्याचा निषेध म्हणून राहाता शह

LOK News 24 I“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा
संगमनेर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर
थोरातांच्या घरात गायरान जमिनीची वरात जोरात; कारखानदार वराच्या तर गौणखनिज चोरटे वधूच्या भूमिकेत

राहाता ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला त्याचा निषेध म्हणून राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडोमार आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. राजकोट किल्ल्यावर पुन्हा महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा. राहाता नगरपालीकडे असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गोडावून मध्ये डांबवून ठेवला आहे तो मुक्त करून त्वरित बसविण्यात यावा. सदरच्या पुतळ्याच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत फक्त राजकीय हेतूपोटी तो पुतळा डांबून ठेवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी,शिवप्रेमी यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडीचे प्रभाताई घोगरे, सचिन गुजर, सचिन चौगुले, धनंजय गाडेकर, गणेश सोमवंशी, सुनील परदेशी, अनिल बोठे, नितीन सदाफळ, रणजीत बोठे, निलेश कारले, दिनेश आरणे, शशिकांत लोळगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS