Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खिर्डी गणेश ते येसगाव रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असुन त्यातीलच खिर्डी गणेश ते येसगाव हा विद्यार्थी, नागरिकांच्य

शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुले
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्रांतीमध्ये मोठे योगदान
कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभेचा समारोप

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असुन त्यातीलच खिर्डी गणेश ते येसगाव हा विद्यार्थी, नागरिकांच्या दृष्टीने राज्य मार्गाला जोडणारा जवळचा रस्ता या रस्त्याची अत्यंत  दयनींय अवस्था झाली. या रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाल्याने काही ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी गोळा करुन या रस्त्याची दुरुस्ती करुन सुस्थितीत रस्ता केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाच पण प्रशासनाच्या व स्वतःला पुढारी म्हणून घेणार्‍यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे.  
खिर्डी गणेश गाव परीसरातील शेतकरी नागरिक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सर्वच  रस्त्यांवरुन चारचाकी वाहनांचे सोडाच पण पायी चालणेही मुस्कील झाले आहे त्यातच अत्यंत वर्दळीचा व खिर्डी गणेश सह बोलकी,अंचलगाव येथिल नागरिक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या खिर्डी गणेश ते येसगाव या रस्त्यावर ठीकठीकाणी दीड ते दोन फुटाचे खड्डे पडले  त्या खड्ड्यात  पावसाचे पाणी साचत असल्याने रोडचा अंदाज येत नसल्याने विद्यार्थी सायकल सह पाण्यात पडत सत्ताधा-यांसह प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्ती कडे अक्षरशः कानाडोळा केला माञ काही जागृत ग्रामस्थांनी एकञ येत खिर्डी गणेश ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सोपान चांंदर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणी गोळा करत जेसीबी च्या सहाय्याने सदरील रस्त्यावरील रस्यात येणार्‍या काट्या काठत डंपरच्या सहाय्याने खड्डे बुजवत रोडवर  मुरुम टाकून त्यावर टंकरने पाणी मारुन रस्ता व्यवस्थित केला या अगोदर सदर रस्त्यावर अनेक वेळा मुरुम टाकला माञ कधीही वर्गणी गोळा करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली नाही. दरम्यान खिर्डी गणेश परिसरातील अनेक वर्षा पासुन मागणी असलेल्या खिर्डी गणेश- आंचलगाव शिव रस्ता, खिर्डी गणेश-चांदर वस्ती रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS