Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपे परिसरातील अतिक्रमण जैसे थे

सुपा ः पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील वाढती बाजारपेठ, सुपा औद्योगिक वसाहतीमुळे कामगारांची वाढती वर्दळ, नगर- पुणे महामार्गावरील सुपा बस स्थानक

राहात्यातील पथदिवे बंदमुळे नागरिकांना मनस्ताप
अमृतवाहिनीतून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी ः प्रा. बानगुडे
माध्यमकर्मींसाठी आत्मा मालिक राबविणार आरोग्य सुरक्षा योजना

सुपा ः पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील वाढती बाजारपेठ, सुपा औद्योगिक वसाहतीमुळे कामगारांची वाढती वर्दळ, नगर- पुणे महामार्गावरील सुपा बस स्थानक यामुळे प्रवाशांची गर्दी पाहता सुपा हे गाव नसून शहराचा दर्जा प्राप्त झालेला दिसतो. काही दिवसापुर्वी सुपा बस स्थानकाभोवती जे अतिक्रमणे झाली होती, ती अतिक्रमणे राजकारणी लोकांच्या लक्षात आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन हायकोर्टाच्या आदेशाने संबधीत सुपा पारनेर रोड, नगर-पुणे हायवे रोड लगची अतिक्रमणे भुईसपाट केली होती.

लोकसभेची निवडणूक होताच राजकीय षडयंत्राने हायकोर्टाचा अवमान करुन अतिक्रमणे असलेल्या जागेतच परत बांधकामे होऊन दुकाने, टपर्‍या उभारल्या गेल्याचे चित्र आज समक्ष पहावयास मिळते. ही वस्तुस्थिती आहे. राजकीय षडएंत्र असल्याने संबधीत सर्वच अधिकारी तोडांवर बोट ठेवुन गप्प बसलेले दिसतात. अतिक्रमणे हायकोर्टाच्या आदेशाने भुईसपाट केली गेली होती, आणि काही दिवसातच हायकोर्टाने अतिक्रमणाच्या जागेत  बांधकामाची परवानगी दिली कशी ? अतिक्रमणे जैसे थे!हा हायकोर्टाचा आदेश आहे की अवमान आहे ही समाजात चर्चेची बाब झाली आहे. 

COMMENTS