Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबब..! एकाच घरात तब्बल चार वेळा चोरी

चोरीचा तपास लावण्याची भयभीत कुटुंबाची मागणी

जामखेड ः जामखेड शहरातील करमाळा रोडवरील उंदावंत यांच्या घरात गेल्या काही काळात सातत्याने चारा वेळा चोरी झाली असून लाखोंचा मुद्देमाल चोरी गेला आहे.

निवडणुकीत बहुमत म्हणजे धार्मिक बहुमत नव्हे…: अ‍ॅड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन
समाज कल्याण व पंचायत समितीच्या वतीने लाभार्थ्यांना अनुदान वाटप
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

जामखेड ः जामखेड शहरातील करमाळा रोडवरील उंदावंत यांच्या घरात गेल्या काही काळात सातत्याने चारा वेळा चोरी झाली असून लाखोंचा मुद्देमाल चोरी गेला आहे. 31 ऑगस्टच्या रात्री झालेल्या घरफोडीत 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत चार वेळा याच घरात चोरी झालेली आहे. कोणत्याही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.
आशा किसन उदावंत वय 42 वर्षे या शिक्षिका म्हणून जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथे नोकरीला असून मुळ रा. करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती रमेश शहाणे हे माझे सासरी आशा टॉकीज शेजारी बीड ता. जि. बीड येथे राहतात. जामखेड करमाळा रोडवरील गुगळे नर्सरी समोरील माझे घर हे बंद असते. मी सुट्टीच्या दिवशी जामखेड येथे येत असते. 31 ऑगस्ट रोजी सायं 7 वा. सुमारास मी व माझी आई वच्छला असे आम्ही माझे करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड येथील घर बंद करुन कुलुप लाऊन माझा भाऊ राजेंद्र किसन उदावंत याचे घरी रा. महावीर मंगल कार्यालय समोर जामखेड येथे गेलो होतो. त्यानंतर जेवण करुन तेथेच झोपलो. सकाळी 6.45 वा. सुमारास मी व माझी आई वच्छला माझे करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोरील घरी गेलो असता मला गेट तुटलेले दिसले व घराच्या दरवाजाचे कुलुप व कडी कोंडा तुटलेले दिसले. मी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाटाचे कुलूप तोडुन कपाटाने नुकसान करुन, कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले व टी.व्ही. फुटून नुकसान झालेले दिसले. त्यानंतर मी कपाटामध्ये माझे पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे पाहिले असता ते मिळुन आले नाहीत व सोन्याचे दागिने केल्याच्या पावत्या देखील मिळुन आल्या नाही. त्यानंतर मी व माझी आई वच्छला असे आम्ही आजुबाजुला परीसरात शोध घेतला असता दागिने व पैसे मिळुन आले नाही. त्यानंतर आमची खात्री झाली की, माझे सोन्याचे दागिने व पैसे काणीतरी चोरुन नेले आहेत. चोरी झालेल्या मालमत्तेमध्ये 80 हजार रूपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठन, यासह 04 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी यासह अनेक दाग्यिांना समावेश असून, तब्बल 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे करत आहेत.सदर चोरी तपासासाठी पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले होते. चोरी झालेल्या घरातील विविध ठिकाणचे वस्तुंवरील फिंगरप्रिंटही घेऊन गेले आहेत. लवकरात लवकर या चोरीचा तपास लावण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS