कोपरगाव : केंद्र शासनाने बी हेवी व डायरेक्ट ज्युस अथवा सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली. एकीकडे इथेनॉल निर्म
कोपरगाव : केंद्र शासनाने बी हेवी व डायरेक्ट ज्युस अथवा सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली. एकीकडे इथेनॉल निर्मिती करीता नवीन डिस्टीलरी उभारणीस प्रोत्साहन द्यायचे तर दुसरीकडे फक्त सी हेवी पासूनच इथेनॉल निर्मिती करणे बाबतचा आग्रह धरायचा हे साखर उद्योगाबाबतचे धोरण कुठेतरी विसंगती निर्माण करणारे आहे. साखरेची गरज लक्षात घेता पुढील हंगाम सुरु करण्यापूर्वी देशात 60.00 लाख मे. टन साखर साठा शिल्लक असणे आवश्यक असतांना हा साठा जवळपास 82.00 लाख मे. टन असून 22.00 लाख मे.टन जास्तीच्या शिल्लक साखरेस निर्यातीस अथवा इथेनॉल निर्मितीस मान्यता दिली असती तर साखरेच्या दरात काही प्रमाणात वाढ होवून साखर कारखानदारीला निश्चितपणे दिलासा मिळाला असता. त्यामुळे साखर कारखानदारीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी केद्र सरकारने साखर उद्योगाबाबत शाश्वत धोरण राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
सहकार क्षेत्रातील प्रगतीच्या शिखराकडे जोमाने वाटचाल करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 71 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना ज्ञानदेव मांजरे यांनी मांडली सदर सूचनेस बाळासाहेब जपे यांनी अनुमोदन दिले. व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. सभेसाठी सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी शॉट सर्किटमुळे ऊस जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण, तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम, ज्ञानदेव मांजरे, विश्वासराव आहेर, पद्माकांतजी कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, वसंतराव दंडवते, बाबासाहेब कोते, नारायण मांजरे, आनंदराव चव्हाण, एम.टी. रोहमारे, राजेंद्र गिरमे, मुरलीधर थोरात, अॅड. शंतनू धोर्डे, अॅड. विद्यासागर शिंदे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दसर्यानंतर लगेच प्र.मे.टन रुपये 125 देणार – कारखान्याची गाळप क्षमता वाढविली आहे. जास्तीत जास्त ऊस गाळपाकरीता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी होणे गरजचे आहे. दरवर्षी 10 लाख मे.टन ऊस गाळप होणे आवश्यक असून आपल्याला स्पर्धा स्वतः बरोबरच करायची आहे. ऊस दराची चिंता करुन नका. आपल्या कारखान्यास प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध असलेला संपूर्ण ऊस गाळपास दयावा.संस्थेची प्रगती आणि सभासद-शेतक-यांची आर्थिक उन्नती हि कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची शिकवण आम्ही सदैव पाळत आलो आहे आणि यापुढे देखील पाळत राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड करायची असून 2023-24 गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्र.मे..टन रुपये 125/- प्रमाणे दसर्यानंतर लगेच शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर करून जिल्ह्यात सर्वाधिक रुपये 3050/-ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली आहे.
पाणी वळविण्याचा शब्द अजितदादा पूर्ण करतील – राष्ट्रीय महामार्गापासून ते गल्ली व शिवार रस्त्यांसाठी जवळपास 750 कोटी निधी दिला. उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाला बळकटी दिली. शहा येथील 232 कोटीच्या सबस्टेशन मधून मतदार संघातील सबस्टेशन जोडले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकाच महिन्यात दोन वेळेस आपल्याकडे आले. त्यांनी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्यात वळविण्यासाठी आश्वासित केले आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मतदार संघातील उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा आशीर्वाद देणार का? असे आवाहन करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली.
COMMENTS