Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजश्रीताई घुले पाटील यांच्याकडून दुकळे कुटुंबाचे सांत्वन

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त भारतीय डाक विभागातील अधिकारी नानासाहेब उर्फ बळवंत त्रिंबक

सरकार जनतेला सामोरे जाण्यास घाबरतंच का ? I Loknews24 I
Sangamner : संगमनेर नगरपालिकेच्या गटार पाणी शुद्धीकरण प्रकल्पास स्थानिकांचा विरोध l Lok News24
गांधी हम शर्मिनदा है तेरे कातिल जिंदा है  | LokNews24

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त भारतीय डाक विभागातील अधिकारी नानासाहेब उर्फ बळवंत त्रिंबक दुकळे यांचे नुकतेच दुःखत निधन झाले.पोस्ट खात्यामध्ये उत्तम सेवा करून करून शेवटच्या काही काळात स्वच्छ निवृत्ती घेऊन गावी व्यवसाय व शेती सांभाळून समाजसेवा धार्मिक कार्य यामध्ये स्वतःला वाहून घेऊन निस्वार्थी काम करणारे दुकळे परिचित होते.कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.परिसरात नानासाहेब मामा या नावाने ते परिचित होते. त्यांच्या निधनानंतर भायगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार राजश्रीताई घुले यांनी नुकतीच दुकळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी भायगावचे माजी सरपंच हरिभाऊ दुकळे, अशोकराव दुकळे, आण्णासाहेब दुकळे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, नानासहेब लोढे, बापुराव दुकळे, अशोक कडुबाळ दुकळे, विष्णु दुकळे यांच्यासह दुकळे कुटुंबातील सदस्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील प्रगतशील शेतकरी अशोक एकनाथ आढाव यांचे नुकतेच निधन झाले. ते अतिशय कष्टाळू व धार्मिक वृत्तीचे होते. नेहमीच धार्मिक कार्यामध्ये ते सगळ्यात पुढे होऊन काम करत होते. भायगाव संस्थेचे माजी चेअरमन गणपत आढाव व रमेश आढाव यांचे ते बंधु होते.आढाव कुटुंबियांचे नामदार राजश्रीताई घुले यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी भायगावच्या सरपंच सौ. मनीषाताई राजेंद्र आढाव, हरिचंद्र घाडगे, सुदाम खंडगळे, अशोक कडुबाळ दुकळे, संतोष आढाव, कडुबाळ आढाव यांच्यासह नातेवाईक व आढाव कुटुबांतील सदस्य उपस्थित होते.

COMMENTS