Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणाचा इशारा

29 सप्टेंबरपासून करणार उपोषण; भाजपचे 113 आमदार पाडण्याचा केला संकल्प

जालना ः मराठा आरक्षणप्रश्‍नी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेत 29 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी उपमुख

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार ः मनोज जरांगे
आंदोलनाला गालबोट लावू नका

जालना ः मराठा आरक्षणप्रश्‍नी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेत 29 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात देखील आक्रमक पवित्रा घेत भाजपचे 113 आमदार पाडणार असल्याचे सांगत भाजपविरोधात दंड थोपटले आहे.
मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त झालेल्या बैठकीत त्यांनी अचानकपणे 29 सप्टेंबरपासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे. सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन. ही आरपारची लढाई आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच, असा हल्लाबोल देखील केला आहे. आपल्याला काही झाले तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही. काळजी करू नका. माझे एक कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत. आपले उपोषण 29 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होईल. आपल्याला मागे हटून चालणार नाही. आपल्याला या सरकारला वठणीवर आणावेच लागेल. कारण हे सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही. आपण सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.  मनोज जरांगे म्हणाले, मुंबईला गेल्याने काही होणार नाही. गरज पडली तर आपण तिकडेही जावू. पण तत्पूर्वी सगळा महाराष्ट्र येथे बसू. आता सरकार दिलेल्या मुदतीत काय करते हे पाहू. आपण यांना निवडणुकीतही पाडू. त्यांचे 113 आमदार पाडू म्हणजे पाडूच. आपल्या जातीचे कल्याण केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही आरपारची लढाई आहे. जे होईल ते होईल. मी महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र फिरेन. सर्वच जिल्हे व तालुके पिंजून काढीन. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच. काय व्हायचे ते होऊ द्या. हे रस्त्यावरच्या लढाईला भीत नाहीत. फडणवीसांना मराठ्यांची माया आहे की नाही हे आपण पाहू. त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर आपण त्यांना खेटू. त्यानंतर पुन्हा पुढे काय करायचे ते ठरवू.

फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा – मनोज जरांगे यांनी देेवेंद्र फडणवीसांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील वर्षभरात माझ्या समाजाचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी बलिदान दिले. अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले. लाखो पोरांवर गुन्हे दाखल झाले. कोटींनी मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे आता सहन होत नाही. त्यामुळे 29 सप्टेंबरची लढाई आरपारची होईल. मी बलिदान झालेल्या कुटुंबाचा बदला देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून घेईन. फडणवीस यांनी मराठा समाजाचे बलिदान घेतले आहेत. त्याला तेच जबाबदार असल्याचा हल्लाबोल देखील जरांगे यांनी केला आहे.

COMMENTS