Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लायन्स क्लब ऑफ राहाताने घेतल्या निबंध स्पर्धा

राहाता सह्याद्रीच्या निबंध स्पर्धेने पर्यावरणाची जनजागृती ः गिरीश मालपाणी

राहाता : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री यांचे वतीने पर्यावरणावर आधारित खुल्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्ध

नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे
राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे
दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल

राहाता : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री यांचे वतीने पर्यावरणावर आधारित खुल्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून खूप प्रतिसाद मिळाला. यास्पर्धेत डॉक्टर्स, इंजिनियर, शिक्षक, साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रायोजक हे प्रथम पुरस्कार क्लबचे व्हॉईस प्रेसिडेंट सुनील धाडगे यांचेकडून एअर बॅग व प्रशस्तीपत्र, द्वितीय पुरस्कार  ज्ञानेश्‍वर जेजुरकर यांचेकडून इलेक्ट्रिक केटल व प्रशस्तीपत्र, तर तृतीय पुरस्कार क्लबचे संस्थापक विनोद गाडेकर यांचेकडून क्रॉम्प्टन इस्त्री, उत्तेजनार्थ बक्षिसे प्रेसिडेंट राजेंद्र फंड, ऋषिकेश गव्हाळे व निलेश पर्वत यांचेकडून टी सेट ठेवण्यात आले होते.
             नुकतेच लायन्स क्लब राहाता सह्याद्रीच्या पदग्रहण सोहळ्यात बक्षीसविजेते स्पर्धक प्रथम डॉ. दिग्विजय जाधव मुंबई,  द्वितीय कवी संतोष तांदळे कोपरगाव, तृतीय कु. वैष्णवी निर्मळ पिंपरी निर्मळ तर उत्तेजनार्थ ऍड. रुपाली हिरवे पेठ, नारायणगांव, भारती सावंत मुंबई,  व प्रकाश खंडागळे जामखेड  यांना व उर्वरित 19 स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप प्रमुख मान्यवर गिरीश मालपाणी, सुधीर डागा, एकनाथराव ढाकणे, ला. धनंजय धुमाळ, सुमित भट्टड यांचे हस्ते वितरण करण्यात आले. स्पर्धकांचा उत्साह पाहून गिरीश मालपाणी म्हणाले की, राहाता सह्याद्री ग्रुपने ही  पर्यावरणावर आधारित भव्य निबंध स्पर्धा भरवून आपल्या क्लबचे नांव महाराष्ट्रभर केले. त्यामुळे पर्यावरणावर महाराष्ट्रभर जनजागृती झाली. लोकांना लिहिते केले. स्पर्धेची माहिती देताना लायन्स इंटरनॅशनल 3234 डी-2 चे पर्यावरण समितीचे चेअरमन म्हणाले की पर्यावरणावर महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचा आमचा उद्देश होता. झाडी सर्वजण लावतात परंतु त्याचे वर्षभर संगोपन होत नाही. लिखाणाच्या माध्यमातून लोक जागृत होतील हा आमचा मानस होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.महाराष्ट्रभरातून 165 निबंध स्पर्धेत दाखल झाले. त्यातून  अनुक्रमे 3 व उत्तेजनार्थ 3 क्रमांकांना तर 19 जणांना प्रमाणपत्र असे भरघोस एकूण 25 बक्षिसे देण्याचे ठरले. आज त्याचे वितरण या मान्यवरांच्या हस्ते झाल्याने मनास आनंद वाटला. सुधीर डागा, एकनाथराव ढाकणे, धनंजय धुमाळ, सुमित भट्टड यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेसिडेंट राजेंद्र फंड यांनी आमच्या क्लबमार्फत  महिलांचे गर्भ पिशवीचे  कॅन्सर, आरोग्य शिबिरे, स्कूल बॅग वाटप व इतर ही उपक्रमाची माहिती दिली.

COMMENTS