Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठी कार्यालयातच केला तलाठ्याचा खून

फेरफार प्रलंबित राहिल्याने तरुणाने चाकूने केले ठार

हिंगोली ः जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात तलाठ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे खळबळ उ

काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड.
आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात
धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या

हिंगोली ः जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात तलाठ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. फेरफार प्रलंबित राहिल्याने हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. तलाठ्याचा डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकूने भोसकून खून झाल्याची घटना बुधवारी ता. 28 दुपारी 12.30 वाजता घडली आहे. संतोेष पवार असे तलाठ्याचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आडगाव रंजेबुवा व बोरीसावंत हे दोन तलाठी सज्जे देण्यात आले आहेत. मागील 3 वर्षांपासून ते या सज्याचे काम पाहत होते. बुधवारी सकाळी तलाठी संतोष पवार हे नेहमी प्रमाणे आडगाव रंजेबुवा तलाठी सज्जा कार्यालयात येऊन कामकाज करीत बसले होते. दुपारी 12 ते साडे 12 वाजण्याच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवर कार्यालयात आला. यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करण्यास सुरवात केली. अचानक त्या तरुणाने काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले. त्यानंतर तरुणाने दुचाकीवरून आल्यापावली पसार झाला. या घटनेनंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला. तो ऐकून गावकर्‍यांनी तलाठी सज्जाच्या दिशेने धाव घेतली. गावकर्‍यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी जाहीर केले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.

COMMENTS