Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी

खासदार शरद पवारांची पुण्यात घेतली भेट

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतांनाच मंगळवारी हर्षवर्धन पाटील या

भीक मागण्यासाठी चिमुरडीला विकले दोन हजार रूपयांना
अंदरसूल येथे श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर (तपोभूमीत) गुरुचरित्र पारायण जप अनुष्ठान सोहळा सुरु | LokNews24
टाळेबंदीमुळे 40 हजार कोटींचे नुकसान

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतांनाच मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधली बैठक संपल्यानंतर आता शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक झाली. या बैठकीतील तपशील समोर आला नसला तरी, हर्षवर्धन पाटील लवकरच पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आज दोघे चर्चा करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागले आहे. या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

COMMENTS