Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभार समाज सामाजिक संस्थेचा पुण्यात राज्यस्तरीय वधुवर मेळावा 

नाशिक -  पुणे (मोशी) येथे रविवार दिनांक १ सप्टेंबर २४ रोजी कुंभार समाज सामाजिक संस्था , महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने भव्य राज्यस्तरीय वधु-वर मेळा

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन
येवल्यात ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न (Video)
पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्येविद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

नाशिक –  पुणे (मोशी) येथे रविवार दिनांक १ सप्टेंबर २४ रोजी कुंभार समाज सामाजिक संस्था , महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने भव्य राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजन समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.  राज्यस्तरीय वधू-वर मेळावा, जनगणना अभियान मोबाईल अॅपचे उद्घाटन व वधू-वर साठी कुंभार मंगलम या वेब साईटचे उद्घाटन समारंभ या दिवशी मुखत्वे होणार असल्याचे संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिष दरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकांव्ये सांगितले.

राज्यभरातून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हानिहाय समितीचे पदाधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने नाशिक जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात वधु वर उपस्थित असणार असल्याचे प्रदेश कार्यध्यक्ष रमाकांत क्षीरसागर ,  जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे , वधु वर आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पुंडलीक सोनवणे यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतीश दरेकर प्रदेश अध्यक्ष , तर कार्यक्रमाचे मुख्य “अध्यक्ष” राज्य प्रदेश कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर हे असणार आहेत. तसेच यावेळी संस्थेचे सर्व विभागनिहाय पदाधिकारी तसेच जिल्हाध्याक्षासह तालुका अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारणी समितीचे पदाधिकारी राज्यभरातून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी  राजकीय , सामाजिक , शैक्षणीक , व्यावसायिक , धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाचा सर्वांनी येऊन आनंद द्विगुणीत करावा असे नाशिक जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहेत 

समाजातील मुलामुलींच्या  वाढत्या विवाहाच्या समस्यां ह्या अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत असून कुंभार समाज एक प्रामाणिक आदर्श निर्माण करण्याचे काम करत आहेत जिल्हा पदाधिकारी याच्याशी समन्वय करून ०१ सप्टेंबर २०२४ रोजी  नाव नोंदणी करून वेळेत उपस्थित रहावे. श्री रमाकांत क्षीरसागर – प्रदेश कार्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य 

कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येतात. तसेच ह्याही वर्षी राज्यस्तरीय वधु वर मेळाव्याचे आयोजन करून कुंभार समाज विचार विनिमय योग्य साधत असून त्याचा फायदा मुला मुलींना नक्कीच होतो राज्य भरातून हजारोंच्या संख्येत वधुवर नावनोंदणी झाली असून नाशिक जिल्ह्यातून देखील ३०० च्या आसपास वधुवर नाव नोंदणी झाली आहेत.  श्री पुंडलीक सोनवणे – प्रदेश    उपाध्यक्ष, वधु – वर आघाडी  महा.राज्य

COMMENTS