Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदगुरू शुक्राचार्य मंदिरामुळे कोपरगावची ओळख ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः जगातील एकमेव परम सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव बेट येथे आहे. गत पाच दिवसांपासून भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम मो

पुणतांबा परिसरातील बंधारे व पाझर तलाव ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे ः विवेक कोल्हे
पाट-पाण्याच्या आर्वतनांचे काटेकोर नियोजन करावे
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः जगातील एकमेव परम सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव बेट येथे आहे. गत पाच दिवसांपासून भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पूजेचे यजमान म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे होते.

प्रधान हवन, उत्तरांग हवन, बलिदान पूर्णाहुती, श्री. मूर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा व अनावरण महानैवेद्य, महाआरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रतिक्रिया देताना विवेक कोल्हे यांनी शुक्राचार्य महाराज मंदिराची महती जगभर आहे.जगातील एकमेव मंदिर हे कोपरगाव येथे आहे.अध्यात्मिक ठेवा लाभेलाला हा परिसर आहे. संजीवनी मंत्र आणि शुक्राचार्य महाराज यांची महती अगाध आहे.विवाह सोहळ्याचे मुहूर्त न पाहता शुभ कार्य होणारे प्रभावी स्थान म्हणून मंदिराची प्रचिती सर्वत्र आहे. तेजस्वी मूर्तीची स्थापना होत असून भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक स्थळावर आशीर्वाद घेण्यासाठी येऊन मंदिरासह परिसराचा अमूल्य ठेवा जतन व्हावा. कोपरगाव आणि परिसराचे हे भाग्य आहे की एकमेव मंदिर आपल्या परिसरात आहे. मंदिर समितीने अतिशय उत्तम आयोजन केले असून हा सोहळा कायमस्वरूपी स्मरणीय ठरणार आहे.पौराणिक आणि अध्यात्मिक समृद्धता येणार्‍या पिढ्यांना आयुष्य जगण्यासाठी मोलाची ठरते. युवा शक्तीला अध्यात्मिक ऊर्जा मिळाली तर त्या पिढीची जडणघडण निश्‍चित आदर्श होते अशी भावना या सोहळ्याच्या प्रसंगी कोल्हे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास आखाडा परिषदेचे प्रवक्ते प.पू.महंत डॉ. भक्तीचरणदासजी महाराज, महंत राजारामजी महाराज, महंत बालकदासजी महाराज, महंत चंदनदासजी महाराज, महंत पद्मचरणदासजी महाराज, महंत रमेशगिरीजी महाराज,महंत चंद्रहार महाराज, महंत परमानंद महाराज, महंत राघवेश्‍वरानंद गिरी महाराज (उंडे महाराज), साध्वी शारदा माताजी, जोशी गुरू, संजीवनी शिक्षण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन नितीनदादा कोल्हे, अंबादास देवकर, पराग संधान, संभाजीराव गावंड, राजेंद्र सांगळे, पोपटराव नरोडे, डॉक्टर क्षिरसागर, चंद्रशेखर भोंगळे, डॉक्टर भट्टड, विजयराव रोहम, दत्तात्रय सावंत,हेमंत वर्धन, दादाभाऊ नाईकवाडे, मंगेश पाटील,सचिन सावंत,जयप्रकाश आव्हाड, नरेंद्र आव्हाड, दीपक शिंदे, संदीप शिंदे, गोविंद शिंदे, अभिषेक आव्हाड, विशाल आव्हाड, कैलास लहिरे, सुनील नाईकवाडे, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन को-हाळकर, सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी,हेमंत पटवर्धन तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्‍हे, सदस्य संजय वडांगळे, रोहन दर्पेल, शरद त्रिभुवन, चांगदेव आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित बरखेडे, विजय रोहम,आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, दिलीप सांगळे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, विशाल राऊत,व्यवस्थापक राजाराम पावरा, कैलास जाधव, अनिल आव्हाड, संतोष नेरे, प्रमोद नरोडे, विनोद नाईकवाडे, सोमनाथ म्हस्के, सचिन सावंत, गोपी गायकवाड, सिद्धार्थ साठे, सिद्धांत सोनवणे, रुपेश सिनगर, रोहित कनगरे,जयप्रकाश आव्हाड, सुजल चंदनशिव यांच्या सह  विश्‍वस्त मंडळ, सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

COMMENTS