Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी कडेवळीत ते शेडगाव फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे

पहिल्याच पावसात दुरावस्था ; कोट्यवधींचा निधी गेला पाण्यात

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत ते शेडगाव या तीन ते चार किलोमीटरच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करू

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
वीस खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक
जर्मनी येथील ४० साईभक्तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत ते शेडगाव या तीन ते चार किलोमीटरच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता तयार केला.मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
               या बाबत अधिक माहिती नुसार एप्रिल 2024 या महिन्यात सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून टाकळी कडेवळीत ते शेडगाव फाटा या चार किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण होऊन अवघे काही महिने उलटत नाही तोच सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे सुमारे अडीच कोटी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. जागोजागी रस्ता उखडल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली असून हा रस्ता काही ठिकाणी खचला आहे. खचलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.  रस्त्यावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. रस्त्याच्या कामाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आम्ही नागरीक रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत असे तेथील नागरिकांनी सांगितले

COMMENTS