Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर घटनेचा राहुरीतील मुस्लिम महिलांकडून निषेध

देवळाली प्रवरा ः जमात ए इस्लामी हिंद महिला विभाग राहुरी, जमीयत ए उलमा हिंद व समस्त मुस्लिम महिला राहुरी यांच्या वतीने बदलापुर येथील दोन लहान मुली

शिर्डीसाठी 650 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क
महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत
अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा

देवळाली प्रवरा ः जमात ए इस्लामी हिंद महिला विभाग राहुरी, जमीयत ए उलमा हिंद व समस्त मुस्लिम महिला राहुरी यांच्या वतीने बदलापुर येथील दोन लहान मुलींवर झालेला अत्याचार तसेच कोलकता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मोमीता यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदार साहेब राहुरी यांना निवेदन देण्यात आले.
      सरकारने या प्रकरणाची सर्व समावेशक चौकशी करून पीडीतांना न्याय मिळवुन द्यावा, सर्व शैक्षणिक संस्थामध्ये कड़क सुरक्षा नियमावली राबविण्यात यावी व समाजामध्ये महिलांचा आदर वाढविण्यासाठी जनजागृति करण्यात यावी, महिला विरुद्ध होणार्‍या हिंसाचारांची तक्रारींवर तात्काळ करवाई करावी आदि मागंण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व धर्मीय महिलानी एकत्र येत समाज माध्यमे आणि मनोरंजन उद्योगात उघड़पणे चालवले जाणारे अश्‍लीलता, अनैतिकता, महिलांचे वस्तुकीकरण थोपविन्यासाठी समाज प्रबोधन करून एक नैतिक आणी सदाचारी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पहिजे या निवेदनावर नीलोफर सय्यद जिल्हा संघटक महिला विभाग जमात ए इस्लामी हिंद अहमदनगर, इनामदार अजीज फातिमा स्थानिक अध्यक्षा जमात ए इस्लामी हिंद राहुरी, जमीयत उलमा हिंदच्या यास्मीन इमरान सय्यद, परवीन नसीर पठान, रूमाना जाविद शेख, तबस्सुम शेख, समीना शेख, फरहत सय्यद, सलमा शेख, मिनाज सय्यद, नेहा अंसारी आदींच्या सह्या आहेत.

COMMENTS