Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून अब्दुल ची एक्झिट ?

मुंबई- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील बरेच कलाकार बद

लव्ह-जिहाद-धर्मांतरसह महामानवांच्या अवमानाबद्दल पाटण येथे निषेध मोर्चा
लोकशाहीच्या मजबूतीचे संकेत !
विरोधी पक्षनेता ठरेल त्यादिवशी काँग्रेसमध्ये स्फोट ः दरेकर

मुंबई– ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील बरेच कलाकार बदलले गेले. आता आणखी एका कलाकाराने या मालिकेला रामराम केल्याची जोरदार चर्चा आहे. या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद सांकला याने शो सोडल्याचं म्हटलं जात आहे. शरद गेल्या 16 वर्षांपासून या मालिकेत काम करतोय. ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडल्याच्या चर्चांवर अखेर शरदने प्रतिक्रिया दिली आहे.

शरद सांकलाने दिलेल्या मुलाखतीत मौन तोडले आणि मे 2024 मध्ये त्याच्या बाहेर पडण्याची चर्चा खोटी असल्याचे म्हटले. शरद सांकला म्हणाला, नाही, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी कुठेही जात नाही आणि शोचा भाग आहे. शोचे कथानक असे आहे की जिथे माझी भूमिका नाही, पण लवकरच अब्दुल परत येणार आहे. हा कथानकाचा भाग आहे. हा खूप सुंदर आणि दीर्घकाळ चालणारा शो आहे आणि मला माझ्या अब्दुलच्या भूमिकेमुळे ओळखले जाते. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

शरद मुलाखतीत म्हणाला, मी शो का सोडू? मी शो सोडण्याचा विचारही करू शकत नाही. नीला टेलिफिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस माझ्यासाठी एका कुटुंबासारखे आहे आणि शोचे निर्माते असित कुमार मोदी माझे कॉलेज मित्र आहेत. तो म्हणाला, मी हा शो कधीच सोडणार नाही. जोपर्यंत हा शो सुरू राहील, तोपर्यंत मी त्याचा एक भाग असेन. अशा परिस्थितीत शोच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांत शैलेश लोढा, राज अनाडकट आणि जेनिफर मिस्त्री यांच्यासह अनेकांनी शो सोडला आहे. या सर्वांनी शोचे असित कुमार मोदी यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला आहे.

COMMENTS