Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीने राखल्या

भाजपचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादीच्या नितीन पाटील बिनविरोध

मुंबई ः राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश होता. भाजपच्या वतीने धैर्यशील

विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती
खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
आचारसंहितेचा फटका, झेडपी भरती लांबणीवर ?

मुंबई ः राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश होता. भाजपच्या वतीने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आलेल्या जागेवर नितीन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस संपल्यानंतर चार उमेदवारांनी दोन जागेसाठी आपले उमदेवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. मात्र हे अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

COMMENTS