Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाऊन्सरने केला अट्टल गुन्हेगाराचा खून

बारमधील बिलाच्या वादातून पुण्यात घडली घटना

पुणे ः पुण्यात सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये बिलाच्या वादावरून बाऊन्सरने एका अट्टल गुन्हेगाराच्या डोक्यात हातोडीमारून खून केल्याची धक्कादायक घट

अमोल मिटकरी यांचा डॉ. रणजित पाटील यांना टोला
कर्नाटकात प्रचाराच्या तोफा थंडावल्या
पालकमंत्री भुसेंनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार

पुणे ः पुण्यात सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये बिलाच्या वादावरून बाऊन्सरने एका अट्टल गुन्हेगाराच्या डोक्यात हातोडीमारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाऊन्सरसह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय 34, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे.
याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपी आकाश कुलकर्णी हा जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार अमोल शेजवळ हा वडगाव पुलाजवळ क्लासिक बारमध्ये त्याच्या साथीदारांसह दारु पिण्यात गुरुवारी रात्री गेला होता. सदर पार्टी उशिरापर्यंत केल्यानंतर तो दारुच्या नशेत मोठमोठयाने बडबड करु लागला तसेच त्याचा तोल देखील जाऊ लागल्याने त्यास उभे देखील व्यवस्थित राहता येत नव्हते. बारमध्ये बसलेल्या इतर ग्राहकांच्या टेबलवर जाऊन तो मोठयाने बडबड करु लागल्याने, ग्राहकांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी याबाबतची तक्रार बार चालकाकडे केली. त्यावेळी बाऊन्सर आकाश कुलकर्णी याने त्यास समजून सांगत बारच्या बीलची मागणी केली. परंतु अमोल हा कोणाचे देखील ऐकण्याचे मनस्थितीत नव्हता. त्याने बाऊन्सर सोबत वाद घालण्यास सुरुवात केल्याने त्यास हॉटेलबाहेर जाण्यास सांगण्यात आले. अमोल व त्याच्या सहकार्यांना हॉटेलच्या बाहेर काही वेळात काढण्यात आल्याने तो जोरजोरात बाऊन्सरशी वाद घालू लागला तसेच शिवीगाळ करु लागला. बाऊन्सरने हॉटेल शेजारील टायर पंक्चरच्या दुकानातील एक हातोडी रागाच्या भरात आणून ती आकाश याचे डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर, आरोपींनी आकाश कुलकर्णी याचे डोक्यात पाण्याचा जार मारल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवत घटनेचा पंचनामा केला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक आंनदराव खोबरे म्हणाले, मयत अमोल शेजवळ याच्यावर यापूर्वी पाच गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपार कारवाई देखील करण्यात आली होती. या गुन्हयात आकाश कुलकर्णी याच्या डोक्यात पाण्याचा जग मारला गेल्याने तो जखमी झाला असून त्याला जगताप रुग्णालयात अ‍ॅडमीट करण्यात आले आहे.

COMMENTS