Homeताज्या बातम्यासंपादकीय

जात्याभिमानींची फसवी वंश शुध्दी !

ऐतिहासिक काळापासून काही समाज आपला वंश शुध्द ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करित असतात. परंतु, भारतीय आणि जागतिक वास्तव हेच आहे की, आज जगातील कोणताही वं

…तर, ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील!
बिळात लपलेले मनुवादी अन् उतावीळ आव्हाड !
अंगणवाडी शिक्षिका : आंदोलन आणि प्रश्न !

ऐतिहासिक काळापासून काही समाज आपला वंश शुध्द ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करित असतात. परंतु, भारतीय आणि जागतिक वास्तव हेच आहे की, आज जगातील कोणताही वंश शुध्द राहीलेला नाही. जात्याभिभान असणाऱ्यांना शुध्द वंशाचे फार आकर्षण; परंतु, त्यातून त्यांच्या वंशात व्यंग निर्माण होण्यापलिकडे अन्य काही साध्य झाले नाही, असे आरोग्य विज्ञान म्हणते!

     कोणताही समाज नेहमीच आपल्यापेक्षा वरच्या मानल्या गेलेल्या समाजाचे अनुकरण करतो. अर्थात, गरीब जसा श्रीमंताचे अनुकरण करू पाहतो; तसे जातीव्यवस्थेत खालच्या बहुजन जाती व्यवस्थेतील सर्वात वरच्या जातीचे अनुकरण करतात. नैतिकता ही ज्यांना शत्रूस्थानी वाटते, अशा वरच्या जात व्यवस्थेने स्वतंत्र भारतात त्यांच्या वैयक्तिक संपत्तीच्या निर्माणासाठी एक योजना शोधून काढली. ती योजना कार्ल मार्क्स याच्या उत्पादकाला होणाऱ्या वरकड कमाईपेक्षा वेगळी संकल्पना आहे.‌ वरच्या जातव्यवस्थेने शोधून काढलेली ही संकल्पना म्हणजे भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवणे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवणे म्हणजे सार्वजनिक पैशांचा देशाच्या विकासासाठी वापर करताना, ज्यांच्यामार्फत वापरण्याचा मार्ग जातो, त्या विश्वस्त म्हणून असणाऱ्यांनी तो जनहिताचा पैसा खोट्या व‌ लबाडीच्या मार्गाने आपल्या घरात आणणे! म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार.  हा मार्ग नैतिक नाही; म्हणून असा भ्रष्टाचार करणाऱ्यांना वर्तमान सरकारने एका फटक्यात आपल्या शरणी आणले. कारण, जे अनैतिक आहे ते बेकायदेशीर आहे, हेच सत्य. अर्थात, असा दंडक उगारणारे वर्तमान सत्ताधीश, त्या पुढचा भ्रष्ट अध्याय निर्माण करित आहेत; हे कालांतराने समोर येईलच!

       भारतीय संविधान आता पाऊण शतकाच्या उंबरठ्यावर आहे. या काळात संविधानिक नैतिकता समाजात निर्माण होऊन, नैतिक अधिष्ठानावर भारतीय समाज जगात उठून दिसला असता. एवढंच नव्हे, तर, तो जगाची महासत्ताही कदाचित बनला असता. परंतु, या देशात वरच्या जातीतील भ्रष्टांचे अनुकरण येथील संविधानवादी समाजातीलही स्थानापन्न झालेल्या पदश्रेष्ठींनी स्विकारले. संविधानवादी असलेल्या समाजातून पुढे गेलेल्यांनी आर्थिक भ्रष्टाचाराचा मार्ग (अपवाद वगळता) नाकारला नाही. परिणामी, वरच्या जातीतील पदश्रेष्ठी आणि खालच्या जातीतील पदश्रेष्ठी यांची एक अघोषित युती झाली. या कडव्या युतीमुळेच भारतीय समाज फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना अभिप्रेत असलेली क्रांती संविधानोत्तर कालखंडात करू शकला नाही. यासाठी, हे पदश्रेष्ठी वेगवेगळ्या सबबी कारण म्हणून सांगतात.

COMMENTS