स्वातंत्र्यदिनापासून रात्री 10 पर्यंत स्वातंत्र्य…करा मजा…; नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन अखेर शिथील, मंदिरे व सिनेमागृहे मात्र राहणार बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनापासून रात्री 10 पर्यंत स्वातंत्र्य…करा मजा…; नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन अखेर शिथील, मंदिरे व सिनेमागृहे मात्र राहणार बंद

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले स्वातंत्र्य नगरच्या व्यावसायिक विश्‍वाला अखेर स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवदिनी म्हणज

दरेकरांमुळे ठाकरेंना कोकणात जावे लागले…; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा
शेतकर्यांचा कृषि माल निर्यातीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रयत्नशील- कुलगुरु डॉ.पाटील
वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले स्वातंत्र्य नगरच्या व्यावसायिक विश्‍वाला अखेर स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवदिनी म्हणजे येत्या रविवारपासून (15 ऑगस्ट) मिळणार आहे. या दिवसापासून कोविड निर्बंध पाळून रात्री 10 पर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथील झाले असले तरी मंदिरे व सिनेमागृहे मात्र बंदच राहणार आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात नगरचा कोविड स्तर निर्बंध एकमध्ये आल्याने जिल्हाभरात सवलत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर 15 दिवसातच या स्तराचे निकष बदलल्याने नगर जिल्ह्याचा निर्बंध स्तर 3मध्ये समावेश झाला. परिणामी, दैनंदिन व्यवहार व व्यवसायांवर काही निर्बंध लागू झाले. सकाळी 7 ते दुपारी 4पर्यंत व्यावसायिक आस्थापनांना परवानगी देण्यात आली होती. हॉटेल व बारही याच काळात सुरू ठेवण्यास व नंतर फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी होती. तसेच शनिवारी व रविवारी पूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येत होते. मागील सुमारे दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या निर्बंधांमुळे व्यावसायिक आस्थापना अस्वस्थ होत्या. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर वगळता नगर शहर व अन्य तालुक्यांतून कोरोना रुग्ण कमी होत असल्याने निर्बंध शिथील करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. राज्य सरकारनेही राज्य स्तरावर असे निर्बंध शिथील केल्याने अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले.
या नव्या आदेशानुसार रात्री 10 पर्यंत उपहार गृहे व बार 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, हीच मुदत दुकाने व शॉपिंग मॉल्सलाही देण्यात आली आहे. तसेच जिम्नशियम-योगासेंटर-सलून व स्पा यांना 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. इनडोअर खेळांसाठी लसीकरण झालेल्या केवळ 2 खेळाडूंना परवानगी असणार आहे. मैदाने व उद्याने खुली राहणार आहेत. विवाह समारंभ बंदिस्त सभागृहात 50 टक्के क्षमतेने वा जास्तीतजास्त 100 लोक तर खुल्या जागेत 50 टक्के क्षमता व जास्तीतजास्त 200 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येणार आहेत. सिनेमा गृहे तसेच स्वतंत्र वा मॉल्समधील मल्टीफ्लेक्स थिएटर आणि मंदिरे बंद राहणार आहेत. या सर्व शिथीलीकरणात तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझेशन या नियमांचे पालन बंधनकारक असणार आहे. नियम मोडणारांवर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज ज्यावेळी 700 टनापर्यंत जाईल, त्यावेळी राज्यात लॉकडाऊन केले जाणार असल्याने ते निर्बंध त्यावेळी जिल्हावासियांवरही लागू केले जाणार आहेत.

त्यांच्यावर बंदी कायम
वाढदिवस, राजकीय व सामाजिक कार्यक्रम तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा वा रॅली, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम आहेत. या बंदी आदेशाचा भंग कोणीही केल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS