ट्विटरकडून देशाच्या राजकारणात हस्तक्षेप ; पक्षाची सर्व अकाऊंट लॉक केल्यानंतर राहुल गांधी संतप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्विटरकडून देशाच्या राजकारणात हस्तक्षेप ; पक्षाची सर्व अकाऊंट लॉक केल्यानंतर राहुल गांधी संतप्त

नवी दिल्ली - काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर गुरूवारी काँगे्रसच्या पाच नेत्यांचे आणि काँगे्रस पक्षाचे देखील अकाऊंट

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वाजले सूप ; लोकसभा मुदतीआधीच अनिश्‍चित काळासाठी स्थगित
राजधानीत विरोधकांच्या जोर-बैठका
महिलेला मागितली एक कोटी खंडणी l DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली – काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर गुरूवारी काँगे्रसच्या पाच नेत्यांचे आणि काँगे्रस पक्षाचे देखील अकाऊंट निलंबित केले आहे. मात्र, आपल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून ट्विटरने आपल्या कृतीचे समर्थन केले होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतःचे आणि पक्षाची सर्व अकाऊंट लॉक केल्याबद्दल ट्विटरवर निशाणा साधला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करत भाष्य केलं आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी म्हटले आहे की, ट्विटर खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी कंपनी राजकारण करण्याचं ठरवत आहे. एक राजकारणी म्हणून मला अशा गोष्टी आवडत नाहीत. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. हे फक्त राहुल गांधींना गप्प करण्याबद्दल नाही. माझे जवळजवळ 19 ते 20 दशलक्ष फॉलोअर्स होते आणि तुम्ही त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखत आहात. हे तुम्ही काय करत आहात? ट्विटरने या कृतीने हे सिद्ध केले आहे की न्यूट्रल प्लॅटफॉर्म नाही. गुंतवणूकदारांसाठी ही एक धोकादायक गोष्ट आहे कारण राजकीय स्पर्धेत कोणाची बाजू घेतल्यास ट्विटरसाठी वाईट परिणाम होऊ शकतात, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. हा आपल्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माध्यमांवर नियंत्रण आहे. मी समजत होतो की, ट्विटरच आशेचा एक किरण होता जिथे आपण ट्विटद्वारे आपला मुद्दा मांडू शकत होतो. पण ते तसे नाही. हे दर्शवते की ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नसून वस्तुनिष्ठ आहे, जे काही लोक त्यांच्या पद्धतीने वापरत आहेत. हे एक पक्षपाती व्यासपीठ आहे आणि ते सध्याचे सरकार जे म्हणते तेच ऐकते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

COMMENTS