Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीच्या शिक्षणसम्राटाचा मृत्यू की हत्या ?

मुंबई ः डोंबिवली येथील शिक्षणसम्राट शिवाजी जोंधळे यांच्या मृत्यूचा घोळ अद्याप संपला नाही. आता त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांना वेळेवर उपचार मिळाल

मुनव्वर फारुकीचे ब्रेकअप
नगर अर्बनला फसवणारा गायकवाड अखेर पकडला
Ahmednagar : खाजगी हॉस्पिटलला जवळपास सहा कोटी रुपयांचा दणका | LOKNews24

मुंबई ः डोंबिवली येथील शिक्षणसम्राट शिवाजी जोंधळे यांच्या मृत्यूचा घोळ अद्याप संपला नाही. आता त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांना वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार, पोलिसांनी जोंधळे यांच्या दुसर्‍या पत्नी गीता खरे यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी जोंधळे यांनी डोंबिवली, ठाकुर्ली, अंबरनाथ व आसनगाव आदी ठिकाणी 27 शिक्षणसंस्था स्थापन केल्या. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली. यामुळे त्यांना या भागात शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाते. त्यांचा गत 19 एप्रिल रोजी आजारपणामुळे मृ्त्यू झाला. पण त्यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी त्यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या दुसर्‍या पत्नी रेखा खरे यांना जबाबदार धरले. माझे वडील गंभीर आजारी असतानाही गीता खरे व इतरांनी त्यांच्यावर उपचार केले नाही. त्यांना घरातच ठेवले. नातलगांना भेटण्यास मनाई केली. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या नावाने असणार्‍या मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतल्या, असे त्यांनी म्हटले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

COMMENTS