Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरातील नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्या सोडवा

राजमुद्रा प्रतिष्ठानसह विविध सामाजिक संघटनांचे नगरपरिषदेकडे मागणी

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या बाबत  राजमुद्रा प्रतिष्ठान, जनता ग्रुप विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या

Ahmednagar : नगर – कल्याण महामार्गाचे काम सुरु…खा.विखे – आ .जगताप यांनी केली पाहणी | LokNews24
श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करा : उद्योगमंत्र्यांकडे मागणी
BREAKING: पीपीई किट घालून मर्डर … बॉडी फेकली हायवे जवळच्या जंगलात | पहा Lok News24

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या बाबत  राजमुद्रा प्रतिष्ठान, जनता ग्रुप विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन देण्यात आले. राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरात अनेक ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. त्यामुळे पाणी फिल्टरेशन प्लांटची तपासणी करून वॉटर टेस्टिंग करत स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, गणेशनगर भागात पहाटे चार वाजता पाणीपुरवठा होत असून त्याची वेळ बदलण्यात यावी तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत दररोज पाणी पुरवठा करून स्वच्छते बाबत उपाययोजना कराव्यात, पेपर मिल येथील स्मशानभूमित पाणी साठवण्याबाबत व्यवस्था करून ठिकठिकाणी सुरू असलेल्या लहानमुलांच्या बगीचात वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात यावी. नगरपरिषद चौकाला माजी नगराध्यक्ष कै. ज्ञानदेव मुसमाडे यांच्या स्मरणार्थ लावलेला फलक काढण्यात आला असून तो पूर्ववत बसवावा देवळाली नगरपरिषद स्वच्छतेच्या ठेकेदाराने खोटी बिले देऊन पेमेंट काढले असून याबाबत चौकशी करावी तसेच भूमिगत गटार योजनेच्या प्रकल्पाच्या कामामध्ये अनियमितता असून अनाधिकृत कामे झालेली आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या. आठ दिवसांत सदर मागण्यांचा विचार न केल्यास नगरपरिषदेसमोर उपोषण करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.यावेळी विशाल मुसमाडे, जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे तसेच निखिल गोपाळे, सोमा शिंदे,दिपक कोल्हे,किरण चव्हाण,बाबाजी जगधने, अमोल जाधव, शकील शेख, गणेश सिनारे, विजू भिंगारे, उद्धव जाधव, संतोष मोरे, प्रल्हाद नवले, बाळू मोरे, बाबासाहेब मोरे, मच्छिंद्र हारदे, लक्ष्मण चावरे, बाबासाहेब उंबरे, सुनील शिंदे, कुंडलिक सांबारे, बाळासाहेब केशर, साहेबराव त्रिभुवन, ज्ञानेश्‍वर उमाप, बाळू सिनारे, गणेश कोकाटे, सागर जाधव, बबलू राऊत, सुनील बर्डे आदींसह नागरिक उपस्थित होते.

COMMENTS