नवी दिल्ली ःउत्तराखंडमधील चमोली येथे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले. त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद
नवी दिल्ली ःउत्तराखंडमधील चमोली येथे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले. त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले की, डोंगर कोसळल्यामुळे कामेडा, नंदप्रयाग आणि छिंका भागात राष्ट्रीय महामार्गही बंद आहे. बचावकार्य आणि मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे एकूण 135 रस्ते बंद आहेत.
COMMENTS